scorecardresearch

सलमान खाननंतर त्याच्या वकिलांनाही जीवे मारण्याची धमकी

सलमान खानचे वकीलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

salman khan, samlan khan lawyer, hastimal saraswat, hastimal saraswat got threat, bishnoi gang, सलमान खान, हस्तीमल सारस्वत, सलमानच्या वकीलांना धमकी, सलमान खान वकील
सलमान खानच्या वकिलांना ही धमकी बिश्नोई गँगकडून देण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काही दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सिद्धू मूसेवाला प्रकरणानंतर ही घटना घडल्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत हस्तीमल सारस्वत यांनी महामंदिर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर हस्तीमल सारस्वत यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या वकिलांना ही धमकी बिश्नोई गँगकडून देण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काळवीट शिकार प्रकरणात हस्तीमल सारस्वत सलमानचे वकील होते. आता हस्तीमल सारस्वत आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवली आहे. वकील हस्तीमल सारस्वत यांनी सांगितलं, “मागच्या दीड महिना मी अमेरिकेत होतो. जेव्हा मी भारतात परतलो तेव्हा माझ्या ज्युनिअर वकिलानं मला जुबली चेंबरमध्ये मिळालेल्या पत्राबद्दल सांगितलं. ‘सलमान खानचा मित्र नेहमीच आमचा शत्रू असेल. तुझी आणि तुझ्या कुटुंबाची अवस्था देखील मूसेवालासारखी होईल’ असं त्यात लिहिलं होतं.”

आणखी वाचा- कंगनाचा जावेद अख्तर यांच्यांवर गंभीर आरोप, म्हणाली “हृतिकची माफी न मागितल्यामुळे…”

हस्तीमल सारस्वत यांना मिळालेल्या या पत्राच्या खाली एलबी आणि जीबी असं लिहिलं होतं. या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांनी, हस्तीमल यांच्या कुटुंबियांना मिळालेलं धमकीचं पत्र हे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी पाठवलं असल्याची शक्यता वर्तवली आहे. पोलीस आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहे.

दरम्यान यआधी ५ जून रोजी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यालाही असंच एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. सलमान खानचे वडील सलीम खान सकाळी बाहेर फिरायला गेले असता त्यांना हे पत्र मिळालं होतं. या पत्रातही सलमानची अवस्था देखील सिद्धू मूसेवाला सारखी होईल असं म्हटलं गेलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After salman khan his lawyer hastimal saraswat family got threat of death mrj