सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकताच शेहनाज…

बिग बॉस १३नंतर शेहनाज आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या..

Bigg Boss 13 Winner  Sidharth Shukla Dead, Actor Siddharth Shukla Death

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३चा विजेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. तो ४० वर्षांचा होता. हृदय विकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाल्याची माहिती मुंबईतील कूपर रुग्णालयाने दिली. सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकून त्याची मैत्रिण आणि बिग बॉसमधील कोस्टार शेहनाज गिलला धक्का बसला आहे. ती चित्रीकरण करत असलेल्या सेटवरुन निघून गेली आहे.

सिद्धार्थ आणि शेहनाज ही जोडी ‘बिग बॉस १३’च्या घरात असताना चर्चेत होती. घरातून बाहेर पडल्यावर ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शेहनाज किंवा सिद्धार्थने कधीही उघडपणे यावर वक्तव्य केले नाही. पण हे कपल सर्वांचे लाडके कपल होते. सोशल मीडियावर ‘सिदनाज’ म्हणून हे कपल लोकप्रिय होते. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनीही ‘डान्स दीवाने’ या शोमध्ये एकत्र हजेरी लावली होती. तसेच ते बिग बॉस ओटीटीमध्येही गेल्या आठवड्यात दिसले होते.

आणखी वाचा : सिद्धार्थच्या निधनाने बॉलिवूड हादरलं; मनोज वाजपेयी, रविना टंडन, कपील शर्माची पहिली प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

सिद्धार्थच्या निधनाची बातमी ऐकताच शेहनाजला मोठा धक्का बसला आहे. ती चित्रीकरणा करत असलेल्या सेटवरुन निघून गेली आहे. स्पॉटबॉयने शेहनाजच्या वडिलांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘मी आताच तिच्याशी बोललो आहे. तिला धक्का बसला आहे. शेहनाजसाठी माझा मुलगा शेहबाज मुंबईला जायला निघला आहे. मला सध्या काहीच बोलायचे नाही. जे काही घडले त्यावर माझा विश्वास बसत नाही’ असे ते म्हणाले.

बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर आज सकाळी त्याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. कूपर रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ‘सिद्धार्थला मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले.’

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: After sidharth shukla death news friend shehnaaz gill left the shoot avb