अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक निधनाने सगळ्यांनाच खुप मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिद्धार्थचे चाहते देखील त्याच्या निधनाचे सत्य अद्याप पचवू शकले नाहीत. त्याचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले असल्याची माहिती समोर आली. बिग बॉसच्या १३ व्या सिझनमध्ये सिडनाज म्हणजेचं सिध्दर्थ आणि शेहनाजची जोडी सर्वांना खूप आवडली. या जोडीचे लाखो चाहते आहेत. दरम्यान शेहनाज कशी आहे हे जाणून घेण्यासाठी सिडनाजचे चाहते खूप अस्वस्थ झाले आहेत.

सोशल मीडियावर शेहनाजचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. यात ती एक पंजाबी गाणं गात खूप दु:खी असल्याचे दिसतं आहे. तसंच चाहते कमेंट करत असल्याचेही या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शेहनाजच्या एका फॅन क्लबने पोस्ट केला आहे. तिने खंबीरपणे उभे राहीले पाहीजे, शेहनाज गिलचा हा व्हिडीओ कधीचा आहे?, असे प्रश्न फॅन्स कमेंट सेक्शनमध्ये करताना दिसत आहेत. शेहनाजचा हा व्हिडीओ सिध्दार्थच्या निधनानंतरचा असल्याचा अंदाज चाहते लावत असून ते हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
UFO spotted during solar eclipse viral video
सूर्यग्रहण लागताना आकाशात दिसले ‘UFO’? व्हिडीओत कैद झालेले दृश्य पाहा; तुम्हीही व्हाल चकित
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

सिध्दर्थच्या अंत्यविधीच्या वेळेस शेहनाज खूप दु:खी होती, काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. या व्हिडीओत सिध्दार्थ लांब गेल्याचे दु:ख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. ती या गाण्याच्याद्वारे, ‘तू माझ्यापासून लांब का गेलास?’, असा प्रश्न विचारताना दिसत आहे. शेहनाज या व्हिडीओमध्ये स्वत:ला सांभाळायचा प्रयत्न करताना दिसत आहे.

सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज पूर्णपणे कोलमडली असून ती सोशल मीडियापासून देखील दूर राहिली आहे. सिद्धार्थचे निधन 2 सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने झाले. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८ मध्ये त्याने ‘बाबुल का आंगन छूटे ना’ या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती. त्याच्या अचानक निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर सिद्धार्थ बरोबरच्या असलेल्या आठवणी शेअर करत सिद्धार्थला श्रद्धांजली अर्पण करीत आहेत.