अलिया भट, टायगर श्रॉफ, यामी गौतम, नील नितीन मुकेश आणि आलोक नाथनंतर आता टि्वटरकरांनी आपला मोर्चा रॅप गायक यो यो हनी सिंगकडे वळवला आहे. शाहरूख खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारसारख्या बॉलिवूडमधील अघाडीच्या कलाकारांच्या चित्रपटातून हनी सिंगची गाणी झळकली आहेत. ‘कॉकटेल’ चित्रपटातील गाण्यांनंतर गायक हनी सिंग प्रकाश झोतात आला. यो यो हनी सिंगवर निशाणासाधत टि्वटरकरांनी अनेक विनोदी टि्वटसची मालिकाच सुरू केली आहे, ज्यामुळे सध्या हनी सिंगचे नाव सोशलसाईटवर ट्रेण्ड होत आहे. जरी हनी सिंगची गाणी पार्ट्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर वाजवली जात असली, तरी अनेकवेळा हनी सिंगच्या गाण्यांवर टिका होताना दिसून आली आहे.