‘द डिसायपल’: “सिनेमाचं कौतुक करण्यासाठी भारतीय संगीताची जाणं असणं गरजेचं नाही”

चैतन्य ताम्हाणेचा ‘द डिसायपल’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित

विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली छाप पाडल्यानंतर ‘कोर्ट’ फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा ‘द डिसायपल’ हा मराठी सिनेमा अखेर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 30 एप्रिलला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलिज झालाय. तब्बल 20 वर्षांनी व्हेनिस चित्रपट महोत्सवात स्थान मिळवणारा ‘द डिसायपल’ हा पहिला भारतीय सिनेमा ठरल्याने या सिनेमाची चांगलीच चर्चा रंगली. व्हेनिस चित्रपट महोत्सवात हा सिनेमा पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय समीक्षकांकडून या सिनेमाचं कौतुक करण्यात आलं. त्यानंतर टोरंटो चित्रपट मोहत्सवातही या सिनेमाने अनेकांना भुरळ घातली. आंतराष्ट्रीय पातळीवर पसंती मिळवल्यानंतर ‘द डिसायपल’ हा सिनेमा आता जगभरातील प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलाय.

2014 सालातील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘कोर्ट’ या सिनेमानंतर निर्माते विवेक गोंबर आणि दिग्दर्शक आणि लेखक चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘द डिसायपल’ या सिनेमाने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. भारतीय शास्त्रीय संगीतासाठी आपलं आयुष्य अर्पण करणाऱ्या शरदचा प्रवास या सिनेमात मांडण्यात आलाय. भारतातील ‘गुरू शिष्याची परंपरा’ सोबतच संगीताच्या आराधनेसाठी करावा लागणारा त्याग, त्यातून जीवनावर झालेला परिणाम, मनाची घालमेल याचं संपूर्ण चित्रण या सिनेमातून घडतं. “चाळीसाव्या वर्षांपर्यंत आम्ही केवळ रियाजच करत होतो.” हे गुरुजींचं वाक्य २४ वय असलेल्या शरदला अस्वस्थ करून सोडतं. तर “रागाच्या माध्यमतून परमेश्वरापर्यंत पोहचण्याची वाट दाखवली आहे. आणि तो मार्ग स्विकारण्यासाठी त्याग हा करावाच लागणार. यावाटेवर चालायचं असेल तर एकटं आणि उपाशी राहायला शिका.” सिनेमाच्या ट्रेलरमध्येच एकू येणारा दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या आवाजातील या प्रस्तावनेतून सिनेमाचं कथानक लक्षात येतं. नोकरी की रियाज आणि संगीत यात निवड करताना शरदची झालेली अस्वस्थता इथे दिसून येते.

आंतराष्ट्रीय स्तारावर कौतुक

आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक समीक्षकांनी आणि पत्रकारांनी या सिनेमाचं कौतुक केलंयं. हॉलिवूडच्या प्रसिद्ध पत्रकार आणि लेखिका डोबरा यंग यांनी म्हंटलंय, “ही जगभरातील तरुणांची कथा आहे ज्यांना आकाशातील चांदण्या हव्यात मात्र प्रत्यक्षात त्यांचे पाय जमिनीवर बांधले गेले आहेत हे त्यांच्या लक्षात येतं. ही काही वाईट गोष्ट नाही. या सिनेमातील शरद आपल्या कलेसाठी खासगी आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग करतो. ”

‘द गार्डियन’ या जगप्रसिद्ध मासिकाचे लोकप्रिय लेखक झॅन ब्रूक्स यांनी म्हटंल आहे, ” चैतन्य ताम्हाणेच्या सिनेमाचं कौतुक करण्यासाठी तुम्हाल भारतीय संगीताची जाण असणं गरजेचं नाही.”

सिनेमासाठी देशभर प्रवास

या सिनेमासाठी चैतन्यने तब्बल चार वर्ष मेहनत घेतली आहे. यासाठी त्याने देशभर प्रवास केला . शास्त्रीय संगीतातील अनेक संगीतकार आणि जाणकारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून शास्त्रीय संगीताचा खोलवर आभ्यास केलाय. भारतीय शास्त्रीय संगीताचा इतिहास मोठा आहे. या इतिहासातली काही पाने चाळण्याचा प्रयत्न त्याने केला. यातून नव्या पिढीसमोरं उभी राहणारी आव्हानं आणि कलेशी जोडण्यासाठी करावं लागणारं जीवनाचं तप हा सगळा संगीतमय प्रवास मांडण्याचा प्रयत्न चैतन्यने ‘द डिसायपल’ या सिनेमात केलाय.

आल्फासो क्युअरन हे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. तर इतिहासतज्ज्ञ आणि नावाजलेले तबलावादक अनिश प्रधान यांनी या सिनेमाला संगीत दिलंय. या सिनेमात गायक आदित्य मोडकने शरद नेरुळकर ही मुख्य भूमिका साकारली आहे. त्याचसोबत या सिनेेमात अरुण द्रविड, दीपिका भिडे भागवत आणि दिवंगत निर्मात्या आणि दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: After various international film festivals chaitanya tamhane the disciple marathi movie released on netflix kpw

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या