scorecardresearch

“तू फक्त माझाच…” श्रेया बुगडेची ‘त्याच्यासाठी’ केलेली पोस्ट चर्चेत

या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रचंड वाद निर्माण झाला होता

shreya bugde final
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा ‘पठाण’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या बक्कळ कमाई करत आहे. चार वर्षांनंतर शाहरुखने रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी केली. ‘पठाण’चे शो अजूनही हाऊसफुल आहेत. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहा दिवसांमध्येच जगभरात ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. सामान्य प्रेक्षकांप्रमाणे मराठमोळी अभिनेत्रीदेखील चित्रपट बघण्यासाठी गेली होती.

अभिनेत्री श्रेया बुगडे झी मराठीवरील ‘चल हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली आहे आणि सोशल मीडियावरही तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. मात्र ती शाहरुख खानची मोठी फॅन आहे. तिने कायमच हे दाखवून दिले आहे. नुकतीच ती पठाण चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात गेली होती. तिथे शाहरुख खानचे पोस्टर लावले होते. त्या पोस्टरला किस करत तिने फोटो शेअर केला आहे. ‘तू फक्त माझाच’ असा कॅप्शनदेखील दिला आहे.

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिका यांनी रचला नवा विक्रम; टेलर स्विफ्ट, BTS बँडला टाकले मागे

शाहरुखचा हा जबरदस्त कमबॅक प्रेक्षकांनी धूमधडाक्यात साजरा केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रचंड वाद निर्माण झाला, तरीसुद्धा अगदी कमी प्रमोशन करूनही ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला आहे.

‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच चित्रपटात सलमान खानची झलक पाहायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षक आता चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहेत

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 16:36 IST
ताज्या बातम्या