scorecardresearch

Vikram vedha : राकेश रोशन यांनी केवळ मुलाचे नव्हे तर संपूर्ण टीमचे केले कौतुक, म्हणाले “हा चित्रपट.. “

प्रख्यात दिग्दर्शक राकेश रोशन यांनी हा चित्रपट बघितला आहे.

Vikram vedha : राकेश रोशन यांनी केवळ मुलाचे नव्हे तर संपूर्ण टीमचे केले कौतुक, म्हणाले “हा चित्रपट.. “
Bollywood director

‘ब्रह्मास्त्र’ ‘चूप’ या चित्रपटानंतर सध्या हवा आहे ती एकाच चित्रपटाची तो चित्रपट म्हणजे ‘विक्रम वेधा’. या चित्रपटात पहिल्यांदाच हृतिक रोशन, सैफ अली खान हे दिग्गज कलाकार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. हा चित्रपट मूळ तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ चित्रपटात विजय सेतूपती, आर माधवन हे कलाकार होते. या चित्रपटातून हृतिक सैफ धमाकेदार ऍक्शन करताना दिसून येणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये देखील हृतिक भाव खाऊन गेला आहे. या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंगदेखील सुरू झाले आहे. अशातच चित्रपटाबद्दल आता बॉलिवूडमधील कलाकार व्यक्त होऊ लागले आहेत.

प्रख्यात दिग्दर्शक राकेश रोशन यांनी हा चित्रपट बघितला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे, ‘विक्रम वेधा पाहिला उत्कृष्ट चित्रपट आहे, दिग्दर्शक, निर्माते, टीमने उत्तम काम केले आहे’. याआधी चित्रपटाचे कौतुक अभिनेत्री करीना कपूरनेदेखील केलं आहे. या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगला ती हजर होती. चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत चित्रपटाचे आणि टीमचे कौतुक केले आहे.

ही तर सर्कशीतील…” अनन्या पांडेच्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले आहे. विक्रम वेधा हा ३० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे.

बॉलिवूड कलाकारांनी कौतुकाची पावती दिली असली तरी नेटकऱ्यांनी या चित्रपटाला ट्रोल केलं आहे. नुकताच सैफ अली खानचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ते आपल्या मुलाच्या नावावरून आपले मत व्यक्त केलं आहे. या व्हिडिओमध्ये सैफ अली खान म्हणत आहे की, ‘मी माझ्या मुलाचे नाव सिकंदर ठेवू शकत नाही आणि खरे तर त्याचे नाव रामही ठेवू शकत नाही. मी एखादे चांगले मुस्लीम नाव ठेवेन’. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना हा ट्रेंड व्हायरल होत असल्याने निर्माते चिंतेत पडले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-09-2022 at 15:17 IST

संबंधित बातम्या