‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील आसावरी खऱ्या आयुष्यातही आहे सुगरण

“मला जेवण करून खायला घालायला खूप आवडतं, खूप लोक माझ्या घरी माझ्या हातचं जेवून जातात. त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा”, असं त्या म्हणतात.

nivedita saraf
निवेदिता सराफ

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. त्यामुळे कलाकारांना त्यांची आवड-निवड जपण्यासाठी मोकळा वेळ मिळाला आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेला आणि त्यातील कलाकारांना सर्वजण मिस करत आहेत.

अभिनेत्री निवेदिता सराफ या देखील त्यांच्या आवडत्या गोष्टी करताना दिसतायेत. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून त्या आसावरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. मालिकेत आसावरीला स्वयंपाकाची प्रचंड आवड असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आसावरी एक उत्तम सुगरण आहे आणि तिच्यासारखंच निवेदिता यांनादेखील स्वयंपाक करायला खूप आवडतं. ‘मला जेवण करून खायला घालायला खूप आवडतं, खूप लोक माझ्या घरी माझ्या हातचं जेवून जातात. त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा असं मला वाटतं,’ असं त्या म्हणतात.

लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत निवेदिता त्यांच्या घरी रोज वेगवेगळे पदार्थ बनवत असततात. त्यांच्या रेसिपीज चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करतात. त्यांचं स्वत:चं युट्यूब चॅनेलही असून त्यावर त्यांचे स्वयंपाक करतानाचे अनेक व्हिडिओ त्या पोस्ट करत आहेत. निवेदिता यांनी नुकताच ‘व्हेजिटेबल स्टू’ या पदार्थाची रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केली होती. चाहत्यांनाही ही रेसिपी आवडली असून या व्हिडीओवर त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aggabai sasubai fame asavari aka nivedita saraf cooking different dishes in lockdown ssv

ताज्या बातम्या