आराध्याच्या ‘अॅन्युअल डे’ला पोहचले अभिषेक-ऐश्वर्या

या कार्यक्रमात आराध्याचा परफॉर्मन्स होता.

ऐश्वर्याची राय बच्चन तिच्या लेकीची म्हणजे आराध्याची किती काळजी घेते ते काही वेगळे सांगायला नको. ऐश्वर्या कुठेही गेली तरी आराध्या नेहमीच तिच्यासोबत असते. यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक हे त्यांच्या लाडक्या लेकीच्या अॅन्युअल डे कार्यक्रमाला पोहचले होते. या कार्यक्रमात इतर मुलांसोबत आराध्याचाही परफॉर्मन्स होता.
ऐश्वर्या-अभिषेकसोबत यावेळी शिल्पा आणि राज कुंद्रा हेदेखील दिसले. हे चौघेजण एकाच ठिकाणी बसले होते. त्यावेळी राजने घेतलेला सेल्फी शिल्पाने ट्विटरवर शेअर केला. शिल्पाचा मुलगा विआन हादेखील आराध्याच्याच प्ले स्कूलमध्ये शिकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aishwarya rai abhishek bachchan shilpa shetty are proud parents at their kids annual day