scorecardresearch

छायाचित्रकाराने शेअर केले ऐश्वर्याचे लोभस फोटोशूट

हे फोटो प्रसिद्ध छायाचित्रकार प्रसाद नाईक याने काढले आहेत

छायाचित्रकाराने शेअर केले ऐश्वर्याचे लोभस फोटोशूट
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे फार मनमोहक असे फोटो सोशल मीडियावर आले आहेत. यातल्या एका फोटोमध्ये माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्याने एक फुलांचा साज असलेला मुकूट घातला आहे. हे फोटो प्रसिद्ध छायाचित्रकार प्रसाद नाईक याने काढले आहेत. प्रसादनेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअरही केला आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या कोणत्याही परीपेक्षा कमी दिसत नाही. एकीकडे तिने फुलांचा मुकूट घातला आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने पांढरा ड्रेस घातला आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात ऐश्वर्या रायची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या चित्रपटाआधी ऐश्वर्याचा ‘जज्बा’ हा सिनेमाही हिट झाला होता.

दरम्यान, संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमात ऐश्वर्या काम करणार अशा चर्चा रंगत होत्या. पण अजून त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. संजय लीला भन्साळी यांची सलमान खान आणि ऐश्वर्या ही आवडती जोडी होती. पण ऐश्वर्याने लग्न केल्यानंतर संजय यांचे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग या दोघांना आपल्या सिनेमात घ्यायला सुरुवात केली. दीपिका आणि रणवीरसोबत ते सलग तिसरा सिनेमा करत आहेत. याआधी ऐश्वर्यासोबत त्यांनी ‘गुजारिश’, ‘हम दिल दे चुके सनम’ आणि ‘देवदास’ या सिनेमात काम केले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या निकटवर्तीयाने दिलेल्या वृत्तानुसार, या सिनेमात एक खास नृत्य असेल जे ऐश्वर्याने करावे अशी भन्साळी यांची इच्छा आहे. पण आतापर्यंत ऐश्वर्याने यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

‘पद्मावती’ ही एका सुंदर राणीची कथा आहे. जिच्या आयुष्यात दोन पुरुष असतात. एकाला ती आपल्यासोबत हवी असे वाटत असते तर दुसरा तिचा नवरा असतो. अलाउद्दीन खिलजीचे पद्मावती राणीवर प्रेम असते, त्याती राणी आपल्यासोबतच राहावी असे वाटत असते पण त्यात तो यशस्वी होत नाही. सिनेमात ‘पद्मावती’च्या नवऱ्याची म्हणजे राजा रावल रतन सिंगची भूमिका शाहिद कपूर साकारत आहे. तर खिलजीची भूमिका रणवीर सिंग साकारताना दिसणार आहे. तर ‘पद्मावती’च्या भूमिकेत दीपिका पादुकोण दिसेल. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-12-2016 at 16:44 IST

संबंधित बातम्या