‘कान फिल्म फेस्टिवल’मध्ये ऐश्वर्या राय बच्चनची एन्ट्री झाली आहे. तिच्या साडीतील लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आदिती राव हैदरीनंतर ऐश्वर्यानेही साडी लूकमध्ये ग्रॅण्ड एन्ट्री केली आणि सगळ्यांचे लक्ष वेधले. तिच्या येण्याची सगळेच वाट पाहत होते. दरवर्षी ती वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसायची; पण या वर्षी ती ‘भारतीय नारी’च्या लूकमध्ये दिसली.
ऐश्वर्याच्या दुसऱ्या लूकनेदेखील सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, ज्यामध्ये ती एका काळ्या केप ड्रेसमध्ये दिसली. ऐश्वर्याने रेड कार्पेटवर परिधान केलेल्या बनारसी ब्रोकेड केपवर ||कर्मण्येवाधिकारी मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि|| हा संस्कृत श्लोक लिहिण्यात आला आहे. या आउटफिटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ग्लॅमरस वॉक करण्यापूर्वी ती तिची मुलगी आराध्याबरोबर दिसली होती, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या राय-बच्चन ही बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री आहे, जी दोन दशकांपासून कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपले स्थान निर्माण करीत आहे. तिच्या पहिल्या लूकमध्ये तिने साडी आणि सिंदूर घालून देसी लूकने धुमाकूळ घातला. त्याच वेळी कान्स २०२५ मधील तिच्या दुसऱ्या लूकमध्ये ती मॉडर्न आउटफिटमध्ये दिसली. तिचा हा लूक पाहून चाहतेही प्रभावित झाले.
दुसऱ्या दिवशी आई आणि मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
यावेळीही ऐश्वर्या तिची मुलगी आराध्याबरोबर कान्समध्ये पोहोचली आहे. तिला तिच्या मुलीची किती काळजी आहे हे कोणापासूनही लपलेले नाही. ग्लॅमरस वॉकपूर्वी, ती रेड कार्पेटवर जाताना मुलगी आराध्या बच्चनचा हात घट्ट धरून दिसली. आराध्या देखील पूर्णपणे काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली. आराध्याने याबरोबर एक लॉन्ग कोट घातला होता. दोघेही रेड कार्पेटकडे जाताना एकमेकांशी बोलत होते.
ऐश्वर्याचा दुसरा लूक कसा होता?
ऐश्वर्याने तिच्या दुसऱ्या लूकसाठी डिझायनर गौरव गुप्ताचा ड्रेस निवडला. तिने काळ्या रंगाचा गाऊन घातला होता ज्यावर हलके सिल्वर वर्क होते. ऐश्वर्याने ऑफ-शोल्डर गाऊनबरोबर लॉन्ग केप घातली होती. ऐश्वर्याने बोल्ड रेड लिपस्टिक लावली होती. तिचा डोळ्यांचा मेकअप आकर्षक होता.
७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याचे शानदार पुनरागमन झाले आहे. तिच्या २०२४ च्या लूकने चाहत्यांना निराश केले, परंतु यावर्षी तिने तिच्या शाही आणि सुंदर अवताराने सर्वांना मंत्रमुग्ध केले. ५१ वर्षीय अभिनेत्रीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली आयव्हरी बनारसी साडी परिधान करून तिचा देसी अवतार दाखवला.
ऐश्वर्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ऐश्वर्या शेवटची मणिरत्नमच्या ‘पोनियिन सेल्वन 2’ मध्ये जयम रवी, शोभिता धुलिपाला आणि ऐश्वर्या लक्ष्मीबरोबर दिसली होती. हा ‘पोन्नियिन सेल्वन: आय’ चा सिक्वेल होता आणि त्याचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले होते.