Photos: सौंदर्य कसे असावे तर ऐश्वर्या राय बच्चनसारखे असावे

सौंदर्य हे फक्त तुमच्या दिसण्यावर नसतं तर ते तुमच्या वागण्यातुनही सतत परावर्तीत होत असतं हेच जणू ऐश्वर्या तिच्या वागण्यातून दाखवत आली आहे.

aishwarya rai bachchan, beauty
ऐश्वर्या राय- बच्चन

ऐश्वर्या राय- बच्चन हे नाव ऐकलं किंवा नुसतं वाचलं तरी सर्वात आधी सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते तिचे आरस्पानी सौंदर्य. घारे डोळे, नितळ त्वचा आणि सर्वांशी विनयशीलपणे बोलणारी शांत, सोज्वळ ऐश्वर्या. सौंदर्य हे फक्त तुमच्या दिसण्यावर नसतं तर ते तुमच्या वागण्यातुनही सतत परावर्तीत होत असतं हेच जणू ऐश्वर्या तिच्या वागण्यातून दाखवत आली आहे. नुकतीच ऐश्वर्या पुण्यात एका कार्यक्रमाला गेली होती.

या कार्यक्रमात साऱ्यांच्याच नजरा फक्त आणि फक्त ऐश्वर्यावरच खिळल्या होत्या. या कार्यक्रमासाठी तिने खास गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. या ड्रेसची खासियत म्हणजे या ड्रेसची ओढणी तिने साडीच्या पदरासारखी घेतली होती. फॅशन दीवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्याच्या गुलाबी साडीवर सोनेरी रंगाची काट तिचं सौंदर्य अजूनच खुलवत होती. कमीत कमी मेकअप- आणि दागिने घातलेली ऐश्वर्या कोणत्याही अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती हे मात्र खरं.

ऐश्वर्याच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी तिच्या ‘जॅस्मिन: स्टोरी ऑफ अ लीस्ड वोम्ब’ सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. प्रेरणा अरोडा निर्मित या सिनेमात ऐश्वर्या सरोगेट आईची भूमिका साकारणार आहे. या पोस्टरमध्ये गर्भवती महिलेचे पोट दाखवण्यात आले आहे. पोस्टरमधून सरोगसीचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला आहे.

गुजरातमधील एका महिलेला आई व्हायचं नसतं, पण नंतर ती सरोगसीद्वारे इतरांसाठी आई होण्याचा निर्णय घेते. काही काळानंतर सरोगसीद्वारे जन्म दिलेल्या बाळासाठी भावनिकरित्या गुंतत जाते, अशी या सिनेमाची कथा आहे. या सिनेमाची कथा सिद्धार्थ आणि गरिमा यांनी लिहीली आहे. सध्या ऐश्वर्या तिच्या ‘फन्नी खां’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. यात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव हे कलाकार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aishwarya rai bachchan looks beautiful in pink saree viral photos