scorecardresearch

Video: ऐश्वर्या रायच्या स्टेज परफॉर्मन्सचा जुना व्हिडीओ व्हायरल

सध्या तिचा हा जुना व्हिडीओ चर्चेत आहे..

Video: ऐश्वर्या रायच्या स्टेज परफॉर्मन्सचा जुना व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. आजही ती लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अनेक तरुणी ऐश्वर्याला फॉलो करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या ऐश्वर्या स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ २००५मध्ये आयोजित केलेल्या आयफा अवॉर्ड शोमधील आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत जवळपास ३६ हजार लोकांनी पाहिला आहे.

ऐश्वर्याने ‘फन्ने खान’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. या चित्रपटात राजकुमार राव आणि अनिल कपूर हे देखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता लवकरच ऐश्वर्या मणिरत्नम यांच्या चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ती अनुराग कश्यपच्या ‘गुलाब जामुन’ या चित्रपटातही भूमिका साकारु शकते अशा चर्चा रंगल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या