अवघ्या काही दिवसांपूर्वी पनामा पेपर लीकप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची चौकशी केली. काळा पैसा परदेशात लपवून ठेवल्याचा आणि करचोरी केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायची तब्बल ५ तास चौकशी केली. दरम्यान ईडी चौकशीनंतर पहिल्यांदाच ऐश्वर्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐश्वर्या राय ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. पनामा पेपर लिकप्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची काल (२० डिसेंबर) तब्बल ५ तास ईडी चौकशी झाली. बेकायदेशीर आर्थिक व्यवहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात ही चौकशी करण्यात आली. ईडीने ऐश्वर्याला या प्रकरणातील चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. यानंतर ऐश्वर्या स्वतः चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल झाली होती. या ठिकाणीच तिची चौकशी झाली. यावेळी ऐश्वर्यांला ईडीच्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागला होता.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर तिने प्रसारमाध्यांकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण तिच्या सोशल मीडिया अकाऊंटकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. नुकतंच ऐश्वर्या राय बच्चन हिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने तिच्या आई-वडिलांना लग्नाच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत तिने तिच्या पालकांचा एक थ्रोबॅक फोटोदेखील शेअर केला आहे.

“जर संधी मिळाली तर…”, तब्बल २१ वर्षाने ‘मिस युनिव्हर्स’चा खिताब मिळवणाऱ्या हरनाझला ‘यांच्या’सोबत करायचे काम

ऐश्वर्याने नुकतंच तिची आई वृंदा रॉय आणि दिवंगत वडील कृष्णराज रॉय यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने तिच्या आई-वडिलांना लग्नाच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो शेअर करताना ती म्हणाली, “लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय आई-बाबा. तुम्ही केलेल्या प्रेमासाठी आणि तुमच्या आशीर्वादांसाठी तुमचे खूप खूप आभार.” असे तिने म्हटले आहे.

दरम्यान पनामा पेपर्स लीक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने तिची चौकशी केल्यानंतर ही ऐश्वर्याची पहिली पोस्ट आहे. त्यामुळे सध्या तिच्या या पोस्टची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan shares first post after ed interrogation in panama papers leak case nrp
First published on: 23-12-2021 at 10:07 IST