Cannes Film Festival 2017: ‘पारो’च्या आगमनाने ‘कान’ला चार चाँद

कान महोत्सवात जाण्याचं ऐश्वर्याचं हे १६ वे वर्ष आहे

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनचे कान महोत्सवात आगमन झाले आहे. गेली १५ वर्षे आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी ऐश्वर्या यावर्षीही याच उद्देशाने कान महोत्सवात दाखल झाली. दीपिका पादुकोणने आपल्या सौंदर्याने आधीच या महोत्सवाला चार चाँद लावले असतानाच ऐश्वर्याची एण्ट्रीही घायाळ करणारी होती. दरवर्षी ऐश्वर्या वेगवेगळ्या अंदाजात कानमध्ये आपली छाप पाडत असते. यावर्षी ऐश्वर्याचा कानमधील अंदाज नक्की कसा असेल यावरून जोरदार चर्चा रंगली होती. आता ऐश्वर्याचा पहिला लूक समोर आला असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यंदा कानची थीम हिरवा रंग (ग्रीन) असल्याने दीपिकानंतर ऐश्वर्याही हिरव्या गाउनमध्ये दिसली.

गेल्या वर्षी प्रमाणेच यावेळीही ऐश्वर्या हटके अंदाजात दिसत आहे. तिचा पहिला आऊट फिट हा हिरव्या रंगाच्या नेट गाउन होता. हा फ्लोअर गाउन पारदर्शक होता. ऐश्वर्याने हलकासा मेकअप करताना लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. यामुळे ऐश्वर्याचे सौंदर्य अजून खुलून दिसत होते. ऐश्वर्याचा हा लूक समोर येताच तिच्या चाहत्यांनी त्यास प्रचंड पसंती दिली असून, तिचे फोटो सोशल मीडियावर काही क्षणांत व्हायरल सुरूवातही झाली होती. यानंतर तिने एक पांढऱ्या रंगाचा गाउनही घातला आहे. ऐश्वर्या हिरव्या गाउनमध्ये अधिक सुंदर दिसते की पांढऱ्या गाउनमध्ये हा प्रश्न सध्या चाहत्यांना पडत आहे.

ऐश्वर्या एका सौंदर्य प्रसाधन कंपनीची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर आहे. ही कंपनी या वर्षी त्यांचा २० वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या ब्रॅण्डने ऐश्वर्यालाच रेड कार्पेटवर आपला जलवा दाखविण्याची संधी दिली. ऐश्वर्या २००२ पासून कानमध्ये सहभागी होत आहे. हा महोत्सव १७ मे रोजी सुरू झाला असून, २८ मेपर्यंत चालणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत कान महोत्सवाला गेली आहे.

कान महोत्सवात जाण्याचं ऐश्वर्याचं हे १६ वे वर्ष आहे. २००२ मध्ये तिने पहिल्यांदाच ‘देवदास’ सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि शाहरूख खान यांच्यासोबत रेड कार्पेटवर एण्ट्री केली होती. दरम्यान, कान्समध्ये सहभागी होण्यासाठी ऐश्वर्या गुरुवारीच मुलगी आराध्यासोबत फ्रान्सला पोहोचली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aishwarya rai bachchans first look from cannes 2017 is out and we cannot wait for the final show see photos