ऐश्वर्याचा स्टेजवर धमाकेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल

तिचा हा जुना व्हिडीओ आता पुन्हा व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची ब्यूटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चन सध्या चित्रपटांपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या ऐश्वर्याचा स्टेजवर डान्स करतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ऐश्वर्यचा हा व्हिडीओ एका अवॉर्ड शोमधील असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ती ‘गुजारिश’ या तिच्या चित्रपटातील ‘उडी-उडी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गाण्यातील ऐश्वर्याचा डान्स पाहण्यासारखा आहे. अनेकांना तिचा हा व्हिडीओ आवडला असून त्यांनी व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर अचानक ऐश्वर्याचा हा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. काही वेळातच दोन लाखापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. एका फॅनपेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर जुने व्हिडीओ शेअर करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि विद्या बालनचा देखील मस्ती करतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता ऐश्वर्याचा हा जुना व्हिडीओ पाहून सर्वजण आनंदी झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aishwarya rai old dance video burns internet in lockdown avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या