बॉलिवूड अभिनेता ऐश्वर्या राय ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्याचे चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. ऐश्वर्या तिच्या सौंदर्यासोबत तिच्या स्टाइलमुळे ही चर्चेत असते. ऐश्वर्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकताच ऐश्वर्याचा रॅम्प वॉक करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ऐश्वर्याच्या फॅन पेजवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने सिल्व्हर रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. पण यावेळी ऐश्वर्यासोबत रॅम्पवर पती अभिषेक बच्चन, मुलगी आराध्या आणि आईला देखील दिसत आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शो स्टॉपर असून तिने तिच्या पतीला, मुलीला आणि आईला स्टेजवर आणले म्हणून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. एवढचं काय तर याला म्हणतात संस्कार अशा कमेंट अनेकांनी केल्या आहेत.
आणखी वाचा : एकाच वेळी फणा काढलेल्या तीन सापांसोबत खेळत होता हा मुलगा आणि…; बघा Viral Video
आणखी वाचा : ‘कालचा एपिसोड बघून वाईट वाटलं ना…’, परी आणि मामीचा भन्नाट श्रीवल्ली डान्स पाहिलात का?
ऐश्वर्याच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती सध्या दाक्षिणात्य चित्रपट पोन्नियम सेलवन’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिचा डबल रोल असणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. हा बिग बजेट चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, अभिषेक बच्चनच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो ‘दहावा’, ‘बच्चन सिंह’, ‘साहिर लुधियानवी’ बायोपिक, ‘हॅपी एनिवर्सरी’ आणि ‘धूम ४’ मध्ये दिसणार आहे.