scorecardresearch

धनुषच्या मुलाला ठोठावला दंड, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

रजनीकांत यांचा नातू व धनुष-सौंदर्याच्या मुलाने मोडले वाहतुकीचे नियम

Dhanush son Yatra fined for riding superbike without license and helmet
धनुषच्या मुलाला ठोठावला दंड (फोटो – इन्स्टाग्राम)

दाक्षिणात्य स्टार धनुषचा मोठा मुलगा यात्रा याला चेन्नईमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स आणि हेल्मेटशिवाय सुपरबाईक चालवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. यात्रा अवघ्या १७ वर्षांचा आहे, त्यामुळे त्याला भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकत नाही. वाहतुकीचे नियम मोडल्याने तामिळनाडू वाहतूक पोलिसांनी त्याला दंड ठोठावला. लायसन्स नसण्याबरोबरच यात्रेलाही हेल्मेट घातले नव्हते.

यात्रा पोस गार्डनमध्ये सुपरबाईक चालवत होता आणि त्याचे प्रशिक्षक त्याला बाइक चालवणं शिकवत होते. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, नंतर ते व्हिडीओ हटवण्यात आले. यात यात्राने बाईक चालवताना मास्क घातला होता आणि पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा मोठा मुलगा असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलीस अधिकारी दंड वसूल करण्यासाठी धनुषच्या घरी गेल्याची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिली आहे. त्याने मोडलेल्या नियमांसाठी १००० रुपये दंड वसूल करण्यात आला.

Actor Sagar Karand Suresh Wadkar
Video: सागर कारंडे बऱ्याच काळानंतर दिसला पोस्टमनच्या भूमिकेत, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी पत्र
Akshara Mangalsutra
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये रंगणार राजेशाही विवाह सोहळा, अक्षराने घातलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष
shivang chopra post for sister parineeti chopra and raghav chadha wedding
“या देखण्या तरुणाच्या शेजारी तू…”, परिणीची चोप्राच्या भावाची बहिणीच्या लग्नानिमित्त खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष
Parineeti Chopra-Raghav Chadha wedding menu
राघव चड्ढा-परिणीती चोप्राच्या लग्नात कोणत्या प्रकारचं जेवण असणार? अभिनेत्रीने स्वतः ठरवलाय खास मेन्यू

“मी तिला बेडरूममध्ये…”, अभिनेत्याचे त्रिशाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; संतापलेली अभिनेत्री म्हणाली, “अतिशय अश्लील अन्…”

धनुष आणि ऐश्वर्या वेगळे झाले आहेत, पण पालक म्हणून दोघेही मुलांचा सांभाळ करत आहेत. २०२२ मध्ये, दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून वेगळे होत असल्याची घोषणा केली. त्यांनी या निर्णयामागचे कारण सांगितले नव्हते, पण दोघांनी मिळून हे ठरवलं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. धनुष व ऐश्वर्या अनेकदा मुलाच्या शाळेतील कार्यक्रमांना एकत्र जात असतात. हे दोघे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा अनेकदा होतात, पण अद्याप धनुष किंवा ऐश्वर्याने याबाबत भाष्य केलेलं नाही.

दरम्यान, धनुष सध्या ‘कॅप्टन मिलर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत गुंतला आहे. हा चित्रपट २०२४ मध्ये पोंगलच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. अरुण माथेश्वरन दिग्दर्शित, या चित्रपटात प्रियंका मोहन, शिवराजकुमार आणि संदीप किशन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aishwarya rajinikanth dhanush son yatra fined for riding superbike without license and helmet hrc

First published on: 21-11-2023 at 07:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×