scorecardresearch

“आम्ही तुला गमावले…” लाडक्या श्वानाच्या निधनानंतर अजय देवगण भावूक

ही बातमी अजयने सोशल मीडियावरून शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे.

“आम्ही तुला गमावले…” लाडक्या श्वानाच्या निधनानंतर अजय देवगण भावूक

अभिनेता अजय देवगण सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’मुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असतानाच अजय सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग यांच्याबरोबर ‘थँक गॉड’च्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. तो सोशल मीडियावरून चित्रपटाबद्दलचे अनेक अपडेट्स शेअर करत असतो. हा चित्रपट येत्या ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. या दरम्यान, त्याच्या घरातील एका आदस्याचे निधन झाले आहे. ही बातमी अजयने सोशल मीडियावरून शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा : …आणि प्रियांका चोप्राने भर कार्यक्रमात सेटजवरच निक जोनसला केलं किस, व्हिडीओ तुफान व्हायरल

अजयने त्याच्या पाळीव कुत्र्याचे निधन झाल्याचे सोशल मीडियावरून सांगितले. त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आणि त्यात लिहिले, “काल माझा पाळीव कुत्रा कोकोला आम्ही गमावले. आम्ही सगळे खूप दु:खी आहोत. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. मला आणि साऱ्या कुटुंबालाच तुझी खूप आठवण येतेय आणि कायमच येत राहील.”

अजय देवगण हा प्राणी प्रेमी आहे. त्याने अनेकदा त्याचे आणि कोकोचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु कोकोच्या जाण्याने अजयच्या मनात एक पोकळी निर्माण झाल्याचे या स्टोरीतून दिसत आहे.

हेही वाचा : अजय देवगणच्या ‘थँक गॉड’ चित्रपटाविरोधात शिक्षण मंत्र्यांचे थेट अनुराग ठाकुरांना पत्र, म्हणाले…

दरम्यान, अजय लवकरच ‘थँक गॉड’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राच्या पात्राचा एक अपघात होतो आणि मृत्यूनंतर त्याची भेट थेट चित्रगुप्ताशी होते. भारतीय पुराण ग्रंथात चित्रगुप्त हा एक असा देवता आहे जो मानवाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो. चित्रपटात अजय देवगण हा चित्रगुप्ताच्या भूमिकेत दिसत असून ते पात्र फार विनोदी दाखवण्यात आलं असल्याने या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या