scorecardresearch

‘मी वेलचीची जाहिरात करतो…’, पान मसालाच्या जाहिरातीवरून ट्रोल होण्यावर अजय देवगणनं केलं वक्तव्य

अजय देवगणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

ajay devgn, pan masala ,
अजय देवगणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अजय त्याच्या ‘रनवे ३४’ (Runway 34) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अजय अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत सगळ्या गोष्टी सांभाळल्या आहेत. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, अजयला सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रश्न विचारण्यात आला. अजयला मसाला ब्रॅंडवर अनेक मीम्स व्हायरल होतात. अनेकांना तर अजयने ही जाहिरात केल्याने अनेकांनी आक्षेप घेतला असा प्रश्न अजयला विचारण्यात आला. यावर अजय म्हणाला, “ही वैयक्तिक निवड आहे. जेव्हा तुम्ही जाहिरात करता, तेव्हा तुम्ही पाहता की त्याने होणारे नुकसान किती आहे. मी स्वत: साठी इतकचं बोलेन की मी वेलचीची जाहिरात करतो. मला मान्य आहे की प्रॉब्लम हा जाहिरातीत नाही, जर कोणती वस्तू इतकी वाईट आहे तर त्याची विक्री व्हायला नको.”

आणखी वाचा : राजकुमार हिरानी आणि शाहरुख पहिल्यांदा येणार एकत्र, मजेदार व्हिडीओ शेअर करत केली ‘डंकी’ चित्रपटाची घोषणा

आणखी वाचा : RRR च्या यशानंतर Jr NTR ने घेतली हनुमान दीक्षा, राम चरण प्रमाणे करणार कठोर महाव्रत

दरम्यान, अजयच्या ‘रनवे ३४’ या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रकुल प्रीत (Rakul Preet Singh), बोमन ईरानी (Boman Irani) दिसणार आहेत. तर अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांनी ‘मेजर साब’, ‘खाकी’, ‘सत्याग्रह’, आणि ‘आग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. हे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. आता या दोघांची मुख्य भूमिका असलेला ‘रनवे ३४’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंह, बोमन ईरानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ajay devgn interview runway 34 amitabh bachchan pan masala ad trolls reaction dcp

ताज्या बातम्या