‘हम उस महान छत्रपती शिवाजी की औलाद हैं, जिन्होंने…’, अंगावर येतील शहारे… पहा ‘भुज’चा दुसरा ट्रेलर

या चित्रपटात अजयसोबत सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

chatrapati shivaji maharaj, ajay devgn, bhuj the pride of india,
'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' १३ ऑगस्टला होणार प्रदर्शित.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाचा पहिला ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. तो ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे.

चित्रपटाचा ट्रेलर टी-सीरजच्या युट्यूब अकाऊंवरून शेअर करण्यात आला आहे. दुसऱ्या ट्रेलरमध्ये ही अजयचे दमदार डायलॉग आपल्याला पाहायला मिळतं आहेत. मात्र, सगळ्यात जास्त चर्चा ही अजयच्या एका डायलॉगची होतं आहे. ‘हम उस महान छत्रपती शिवाजी की औलाद हैं, जिन्होंने मुगलों को घुटनों पर ला दिया था और अपने खून से हिंदुस्तान का इतिहास लिखा था।’ या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकल्याने प्रत्येकाच्या अंगावर शहारे नक्कीच येतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका

‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात भारतीय हवाई दलातले शूर अधिकारी विजय कर्णिक यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपटात भारत-पाक युद्धातल्या सत्य घटनांवर आधारित आहे. पाकिस्तानने भुजवर हल्ला केला होता. त्यावेळी विजय कर्णिक हे भुजच्या हवाई तळाचे प्रमुख होते. पाकिस्तानी सेनेने केलेल्या हल्ल्यानंतर हा विमानतळ नष्ट झाला होता. त्यानंतर विमानतळाच्या जवळ असलेल्या माधापार गावतल्या ३०० महिलांच्या मदतीने विजय कर्णिक यांनी विमानतळ पुन्हा एकदा उभारला होता.

आणखी वाचा : अभिनेत्री गहनाचं इन्स्टाग्रामवर न्यूड लाईव्ह; लोकांना म्हणाली, हे पॉर्न आहे का?

ही कथा आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. स्वातंत्र्यदिना आधीच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १३ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजयसोबत सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि नोरा फतेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या आधी अभिषेक बच्चनसोबत ‘द बिग बुल’ या चित्रपटात दिसला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ajay devgn s bhuj the pride of india trailer 2 released the chatrapati shivaji maharaj dialogue in movie got attention dcp