Akhanda 2 Teaser Release: सध्या मराठीसह बॉलीवूड टॉलीवूडमधील चित्रपट प्रदर्शित होत आहेत, त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी आहे. यामध्ये ‘जारण’, ‘हाऊसफुल ५’, ‘ठग लाइफ’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बॉक्स ऑफिसवरील कमाईवरून दिसत आहे.
आता आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अखंड २’ असे आहे. लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता नंदमुरी बालकृष्ण यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अखंड २’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बोयापति श्रीनु यांनी केले आहे. याआधी बोयापति श्रीनु व नंदमुरी बालकृष्ण यांनी दोन-तीन प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केले आहे; तर राम अचंता आणि गोपचंद अचंता हे चित्रपटाचे निर्माते आहेत.
अखंड २’ चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
‘अखंड २’च्या टीझरमध्ये नंदमुरी बालकृष्ण यांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. आध्यात्मिक पात्राबरोबर त्यांचे अॅक्शन सीनदेखील टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत. ‘अखंड’मध्ये जसे त्यांचे पात्र होते, तसेच ‘अखंड २’ मध्येदेखील त्यांचे हे पात्र पाहायला मिळत आहे. ‘अखंड २’चे शूटिंग हे बर्फाळ प्रदेशात झाल्याचे दिसत आहे. आता हा टीझर पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी नंदमुरी बालकृष्ण यांच्या कामाचे कौतुक केले आहे. चित्रपटाचा टीझर हा नंदमुरी बालकृष्ण यांच्या वाढदिवशी प्रदर्शित केला आहे.
‘अखंड’ हा सिनेमा २०२१ साली प्रदर्शित झाला होता. ‘अखंड २’ हा त्याचा पुढचा भाग आहे. ‘अखंड’मध्येदेखील बालकृष्ण नंदमुरी प्रमुख भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट गाजला होता. ‘अखंड’ सिनेमाने १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल किती कमाई कऱणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. २५ सप्टेंबर २०२५ ला हा चित्रपट संपूर्ण भारतात विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.