Akhil Bharatiya Marathi Natya Parishad Award: गेल्या काही काळापासून रंगभूमीवर उत्तमोत्तम नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. यामध्ये ‘शिकायला गेलो एक’, ‘संगीत देवबाभळी, ‘जर तरची गोष्ट’, ‘ज्याची त्याची लव्हस्टोरी’, ‘वरवरचे वधूवर’, ‘असेन मी नसेन मी’, ‘इवलेसे रोप’ अशा अनेक नाटकांचा समावेश आहे.

गेल्या काही काळापासून नाटकांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ १४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. जाणून घेऊयात कुठल्या कलाकारांना कोणते पुरस्कार मिळाले आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. याबरोबरच, सुशांत शेलारला युवा नाट्य पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीचे सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक ‘असेन मी नसेन मी’ हे ठरले आहे. या नाटकास श्रीकृष्ण अनंत पंडित पुरस्कृत ‘अल्बा पंडित’ स्मृती मराठी रंगभूमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक – असेन मी नसेन मी

सर्वोत्कृष्ट अभिनेता – सुव्रत जोशी (नाटक – वरवरचे वधूवर)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – प्रशांत दामले (नाटक – शिकायला गेलो एक)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री – शर्मिला शिंदे (नाटक – ज्याची त्याची लव्ह स्टोरी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – हृषिकेश शेलार (नाटक – शिकायला गेलो एक)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शुभांगी गोखले (नाटक – असेन मी नसेन मी)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार – अद्वैत दादरकर (नाटक – शिकायला गेलो एक)

प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – पूनम सरोदे (नाटक – वेटलॉस)

अभिनयाचा विशेष लक्षवेधी पुरस्कार – निहारिका राजदत्त (नाटक – उर्मिलायन)

सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार – राजेश परब (नाटक – गोष्ट संयुक्त मानापमानाची)

सर्वोत्कृष्ट लेखक – सुनील हरिश्चंद्र व डॉ. स्मिता दातार (नाटक – उर्मिलायन)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार – शीतल तळपदे (नाटक – मास्टर माईंड)

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार – निषाद गोलांबरे (नाटक – वरवरचे वधूवर)

सर्वोत्कृष्ट नाटय व्यवस्थापक पुरस्कार – अजय कासुर्डे

सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार – प्रदीप मुळ्ये (नाटक – असेन मी नसेन मी)

नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार – सुशांत शेलार

हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक १४ जून २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता यशवंत नाटय मंदिर, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई येथे संपन्न होणार आहे. हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

दरम्यान, अभिनेत्री सखी गोखलेने आई शुभांगी गोखले व पती सुव्रत जोशी यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे कौतुक केले आहे. तिने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, या दोघांनी या वर्षात आठ पुरस्कार मिळवले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता येणाऱ्या काळात रंगभूमीवर आणखी कोणती नाटके पाहायला मिळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.