गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’ चर्चेत आहे. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जगभरातील इतर चित्रपट लांबणीवर गेले असताना ‘बेल बॉटम’च्या निर्मात्यांनी मात्र चित्रीकरण सुरु ठेवलं आणि लॉकडाउनमध्येच संपूर्ण चित्रपट तयार केला. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या या ३० सेकंदाचा टीझर पाहता आपण ८०च्या दशकात पोहोचल्यासारखे वाटते. अक्षय कुमारचा रेट्रो लूक चाहत्यांना आवडला आहे.. टीझरची सुरुवात ही अक्षयच्या रेट्रो लूकनेच होते. त्यानंतर अक्षय एका वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. अक्षय या चित्रपटात एका RAW एजेंटची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

‘बेल बॉटम’ या चित्रपटात अक्षयसोबत हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. लॉकडाउननंतर विदेशात शूट होणारा ‘बेल बॉटम’ हा पहिला चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण स्कॉटलॅण्डमध्ये सुरु होतं. हा चित्रपट येत्या २ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रंजित तिवारी यांनी केले आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या वर्षात एकापेक्षा एक हिट चित्रपट देण्यास तयार आले. येत्या काळात ‘सूर्यवंशी’ ‘लक्ष्मी बम’, ‘पृथ्वी राज’ ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ आणि ‘बेल बॉटम’ असे एकूण सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.