डिसेंबरमध्ये अक्षय कुमार देणार ‘गुड न्यूज’

अक्षयने स्वत: ट्विटरवर या गुड न्यूजची घोषणा केली आहे.

akshay kumar
अक्षय कुमार

येत्या डिसेंबर महिन्यात बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार प्रेक्षकांना एक गुड न्यूज देणार आहे. आता ही गुड न्यूज नेमकी काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला ना? तर ही न्यूज आहे त्याच्या चित्रपटाविषयी. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात अक्षयसोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत आहे. २७ डिसेंबर रोजी ‘गुड न्यूज’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अक्षय आणि करिनासोबतच यामध्ये दिलजीत दोसांझ, कियारा आडवाणी, जिमी शेरगिल, अंजना सुखमानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अक्षयनं त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्येच प्रदर्शित होणाऱ्या सलमान खानच्या ‘दबंग ३’ला टक्कर देण्यासाठी आणखी एक चित्रपट सज्ज झाला आहे.

वाचा : रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’साठी प्रेक्षकांना पाहावी लागेल आणखी वाट

‘गुड न्यूज’ नंतर अक्षय कुमार लवकरच ‘मिशन मंगल’ आणि ‘हाऊसफुल ४’मध्ये झळकणार आहे. तर करीना कपूर ‘तख्‍त’ या चित्रपटातून अनिल कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर यांच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar kareena kapoor starrer film good news to release on 27 december

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या