अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ला पंजाबमध्ये प्रचंड विरोध; शेतकऱ्यांनी चित्रपटगृहाबाहेरील पोस्टर फाडले

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात या चित्रपटाविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत.

Akshay kumar Katrina kaif movie sooryavanshi screening stopped Punjab farmers

सध्या बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांची चर्चा सुरु आहे. अनेक चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे आणि अनेक रिलीजसाठी सज्ज आहेत. या सगळ्यामध्ये अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत आला आहे. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. एकीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असताना दुसरीकडे पंजाबमध्ये या चित्रपटाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रचंड विरोध होत आहे.

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दरम्यान, स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात या चित्रपटाविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रोहित शेट्टी या चित्रपटाचे स्क्रिनिंग करणे कठीण झाले आहे. किसान विधेयकाच्या विरोधातील आंदोलनात अक्षय कुमारने पाठिंबा न दिल्याने शेतकरी संतापले आहेत. आता संतप्त शेतकरी अक्षयच्या या महत्त्वाच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करत आहेत.

शनिवारी होशियारपूरच्या स्वर्ण थिएटरमध्ये ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे लाईव्ह स्क्रिनिंग थांबवण्यात आले. अभिनेत्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा न दिल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी अक्षय कुमारविरोधात संताप व्यक्त केला. पीटीआयच्या वृत्तानुसार, भारती किसान युनियनच्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात शहीद उधम सिंह पार्क ते स्वर्ण थिएटरपर्यंत मोर्चा काढला. त्याचवेळी काही संतप्त शेतकऱ्यांनी चित्रपटगृहाबाहेरील चित्रपटाचे पोस्टरही फाडले.

यानंतर त्यांनी सिनेमा हॉलच्या व्यवस्थापनाकडून जबरदस्तीने चित्रपटाचे थेट प्रदर्शन थांबवले. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द होत नाही तोपर्यंत अक्षय कुमारच्या कोणत्याही चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाही, असा आग्रह संतप्त शेतकऱ्यांनी धरला आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने शुक्रवारी जोरदार सुरुवात केली. शनिवारी चित्रपटाचा दुसरा दिवस होता. अपेक्षेप्रमाणे पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात कमाई झाली. दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्यांचा फायदा चित्रपटाला होताना दिसत आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी २६.२९ कोटींचा गल्ला जमवला. बॉक्स ऑफिस इंडियानुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २४.५० कोटींचा गल्ला जमवला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar katrina kaif movie sooryavanshi screening stopped punjab farmers abn

ताज्या बातम्या