Video : अभिमानाने उर भरुन येणारा ‘मिशन मंगल’चा ट्रेलर पाहिलात का ?

मंगळ मोहिमेची योजना आखण्यापासून ती यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आला आहे

भारताच्या मंगळ मोहिमेची खरी कथा दाखविणारा ‘मिशन मंगल’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिका साकरत असून हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

प्रदर्शित झालेला ट्रेलर अक्षयने शेअर केला आहे. हा ट्रेलर २ मिनीट ५२ सेकंदाचा आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नी, सोनाक्षी,शर्मन जोशी हे दिसून येत आहेत. मंगळ मोहिमेची योजना आखण्यापासून ती यशस्वी करण्यापर्यंतचा प्रवास या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आला आहे.

या चित्रपटामध्ये अक्षयने राकेश धवन ही भूमिका साकारली असून तो या मोहिमेचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याच्याव्यतिरिक्त या टीम तारा शिंदे (विद्या बालन), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), शर्मन जोशी (परमेश्वर नायडू), नेहा सिद्दिकी (कृति कुल्हारी) नजर हे कलाकार झळकणार आहेत.

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म मिळून करणार आहेत. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Akshay kumar mission mangal trailer watch video ssj

ताज्या बातम्या