scorecardresearch

‘चला हवा येऊ द्या’मध्ये दिसणार अक्षय कुमारचा मराठमोळा अंदाज, या अभिनेत्रीसोबत केला धम्माल डान्स

अभिनेता अक्षय कुमारनं नुकतीच मराठी कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली होती.

akshay kumar, kriti senon, zee marathi comedy show, chala hava yeu dya, bachchan pandey promotion, अक्षय कुमार, चला हवा येऊ द्या, बच्चन पांडे, क्रिती सेनॉन, अक्षय कुमार इन्स्टाग्राम
बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. लवकरच तो ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मराठी प्रेक्षकांशी अक्षयचं खास नातं आहे आणि त्यामुळेच त्यानं त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली होती.

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे कि मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी नुकतंच ‘चला हवा येऊ द्या’ सेटवर हजेरी लावली.

आणखी वाचा- Video : वादाच्या चर्चांनंतर अक्षय कुमारनं कपिल शर्माला म्हटलं ‘बेवफा’, पाहा व्हिडीओ

पुढील आठवड्यात प्रेक्षकांना हे विशेष भाग पाहायला मिळतील. खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये क्रिती सोबत एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला. त्यांचा हा परफॉर्मन्स इतका अफलातून होता कि टाळ्या आणि शिट्या थांबल्याच नाहीत. अक्षय आणि क्रिती त्यांचा आगामी बच्चन पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते.

आणखी वाचा- प्रसिद्ध अभिनेत्यानं १५ वर्षीय रेखा यांना तब्बल ५ मिनिटं जबरदस्तीने केलं किस, अन्…

चला हवा येऊ द्या च्या मंचावर अक्षय कुमार यांचा मराठमोळा अंदाज देखील प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तसंच खिलाडी कुमार मंचावर आला आहे म्हणून विनोदवीरांनी देखील कल्ला केला आणि अक्षयने देखील या विनोदवीरांसोबत मिळून खूप धमाल केली. ही सर्व धम्माल मस्ती प्रेक्षकांना पुढच्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar on the set of zee marathi comedy show chala hava yeu dya with kriti senon mrj

ताज्या बातम्या