Padman new poster: ‘ही’ अनोखी क्रांती घडवण्यासाठी अक्षय सज्ज

हा चित्रपट पुढच्या वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होईल.

padman, akshay kumar
'पॅडमॅन'

अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या ‘पॅडमॅन’ची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाबद्दल चर्चांना सुरुवात झाली. अक्षयची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्ना निर्मित हा चित्रपट पुढच्या वर्षी २६ जानेवारीला प्रदर्शित होईल. आर. बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले.

ट्विटर अकाऊंटवर हा पोस्टर शेअर करत अक्षयने लिहिलं की, ‘हे पॅड महिलांचं आयुर्मान दोन महिन्यांनी वाढवतं. ते कसं याचा शोध घेण्यासाठी तुम्हाला पाहावा लागणार ‘पॅडमॅन’.’ हा चित्रपट खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी पॅड्स तयार करणाऱ्या कोईमतूर येथील अरुणाचलम् मुरुगानंथम यांच्या जीवनावर आधारित आहे.

या पोस्टरमध्ये अक्षयच्या हातात सॅनिटरी पॅड पाहायला मिळत असून यासंदर्भात तो प्रेझेंटेशन देत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याआधी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अक्षय कुर्ता- पायजमाच्या वेशात दिसला होता, आणि या नव्या पोस्टरमध्ये पूर्णपणे वेगळ्या पोशाखात तो दिसून येत आहे.

वाचा : ‘मानधनाच्या नावावर मला तूटपुंजी रक्कम देण्यात येत होती’

मासिक पाळी हा आपल्याकडे गुप्ततेचा विषय, त्यामुळे त्या काळातील स्वच्छता ही तर दुर्लक्षिलेलीच बाब आहे. मात्र, याच विषयावर अक्षयचा चित्रपट भाष्य करणार असल्यामुळे त्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Akshay kumar padman new poster presenting his revolutionary product