“बस आता खूप झालं…”; साराचा अभिनय पाहून दुखू लागलं अक्षयचं डोकं

अक्षय कुमारनं उडवली साराची खिल्ली; पाहा हा व्हिडीओ…

अभिनेता अक्षय कुमार बॉलिवूडमधील अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. अक्षय आपल्या चित्रपटांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम चर्चेत असतो. मात्र यावेळी अक्षय अभिनेत्री सारा अली खानमुळे चर्चेत आहे. साराने ताजमहलसमोर उभं राहून अभिनय करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा अभिनय पाहून अक्षयनं तिची खिल्ली उडवली आहे.

अवश्य पाहा – “तू तर मर्यादा ओलांडलीस”; नियाचे हॉट फोटो पाहून अभिनेता घायाळ

अक्षय आपला नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘अतरंगी रे’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री सारा अली खान मुख्य व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दोघं आग्रा येथे गेले आहेत. त्यावेळी त्यांनी ताजमहलला भेट दिली. दरम्यान ताजमहलच्या सौंदर्याचं वर्णन करण्यासाठी साराने एक व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये तिनं केलेला अभिनय पाहून अक्षयनं आपलं डोकं दुखू लागल्याचा अभिनय केला.

अवश्य पाहा – सोज्वळ सुनेचा बिकिनी अवतार; हॉट फोटोशूटमुळे चाहते अवाक

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

अवश्य पाहा – आकाशातील परी जमिनीवर…; सुरभीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक

“जसं की तुम्ही पाहताय आत्ताच सारानं यमक शब्दांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पण इतका खराब प्रयत्न मी आजवर पाहिलेला नाही. हे शब्द ऐकून माझं डोकं दुखू लागलं. असो, पण प्रयत्न करत राहा कारण प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही.” असं म्हणत अक्षयने साराची खिल्ली उडवली. तिनं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar sara ali khan atrangi re mppg

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या