बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. अक्षय आणि ट्विंकल दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकताच अक्षयने ट्विंकलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाला २१ वर्ष पूर्ण झाल्याचे त्याने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षयने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोत अक्षय आणि ट्विंकल एकमेकांकडे बघत असल्याचे दिसत आहे. “आपल्या लग्नाला २१ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरी सुद्धा असे वाटते की मी तुला अजूनही ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यातला पहिला दिवस आहे असा भास करून देण्यासाठी धन्यवाद. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या टिना”, असे कॅप्शन अक्षयने दिले आहे. अक्षयने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : मन्नतमध्ये घुसून ‘तो’ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होता, शाहरुख आला तर म्हणाला, “मला फक्त…”

आणखी वाचा : ‘पुष्पा’मुळे लागला जॅकपॉट; समांथाला मिळाली बॉलिवूडमधल्या ३ चित्रपटांची ऑफर

अक्षय आणि ट्विंकलने १७ जानेवारी २००१ ला सप्तपदी घेतली होती. त्यांना दोन मुलं असून आरव आणि नितारा अशी त्यांची नावं आहेत. दरम्यान, अक्षयचा अतरंगी रे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तर लवकर अक्षय ‘बच्चन पांडे’, ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’ आणि ‘पृथ्वीराज’ या चित्रपटांमध्ये दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar shares a post on his wedding anniversary says thank you for making each day feel like the first dcp
First published on: 18-01-2022 at 13:18 IST