‘गोरखा’ चित्रपटातील अक्षय कुमारचा फर्स्ट लूक प्रदर्शित

सध्या अक्षयचा हा लूक चर्चेत आहे.

Akshay Kumar, War Hero, War Hero Major General Ian Cardozo, Major General Ian Cardozo, Gorkha,

‘अतरंगी रे’ आणि ‘रक्षाबंधन’ पाठोपाठ आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘गोरखा’ असून चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अक्षय कुमारने सोशल मीडियावर गोरखा चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. हे पोस्टर शेअर करत त्याने, ‘कधी कधी तुमच्या समोर अशा कथा येतात ज्या तुम्हाला प्रेरणादायी वाटतात. त्यावर काम करण्याची तुमची इच्छा होते. गोरखा ही मेजर जनरल इयान कार्डोजो यांच्या जीवनावरील कथा आहे. हा चित्रपट करताना मला अभिमान वाटत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “तुमच्या सगळ्यांची अप्रत्यक्षपणे लायकी काढली” – आदिश वैद्य

‘गोरखा’ हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे.. कार्डोजो यांनी १९६२, १९६५ साली झालेले युद्ध आणि १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धात कामगिरी बजावली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar shares first look war hero major general ian cardozo from his upcoming film gorkha avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या