अभिनेता अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात अपयशी ठरला. ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बेल बॉटम’, ‘बच्चन पांडे’ हे त्याचे तिन्ही चित्रपट एकापाठोपाठ एक सुपरफ्लॉप ठरले. अक्षयच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. असं असताना आता त्याचा आगामी चित्रपट ‘कठपुतली’ ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ ठरला आयएमडीबी साईटवर सर्वात कमी रेटिंग्स मिळवणारा चित्रपट

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. स्टार नेटवर्क्सने हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यासाठी या चित्रपटाचे हक्क १८० कोटीला विकत घेतल्याचे बोलले जात आहे.

‘पिंकविला’च्या अहवालानुसार, ‘कठपुतली’चे डिजिटल अधिकार अंदाजे १३५ कोटी रुपयांना विकले गेले आहेत. यामध्ये उपाग्रह आणि संगीत यांची किंमत ४५ कोटींपेक्षा जास्त आहे. शेवटी स्टार नेटवर्कशी चित्रपटाच्या निर्मात्यांचा १८० कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे.

हेही वाचा : अक्षय कुमारने दिला अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला मोलाचा सल्ला, व्हिडीओ व्हायरल

हा चित्रपट ‘रत्सासन’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘रत्सासन’मध्ये विष्णु विशाल आणि अमला पॉल हे दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत होते. आता या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन रंजीत एम तिवारी यांनी केलं आहे. हा चित्रपट ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’वर येत्या २ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रकुल प्रीत सिंग यांच्याशिवाय अभिनेत्री सरगुन मेहताही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar starrer crime thriller sold to ott platform for whopping rs 180 crore rnv
First published on: 28-08-2022 at 18:19 IST