“रख विश्वास, तू है शिव का दास”; ‘ओह माय गॉड २’ पहिले पोस्टर प्रदर्शित

विशेष म्हणजे त्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘ओह माय गॉड २’ च्या शूटींगलाही सुरुवात केली आहे.

परेश रावल आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल साकारला जाणार आहे. या चित्रपटाचा पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात अक्षय कुमारचा हटके लूक पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे त्याने त्याच्या आगामी चित्रपट ‘ओह माय गॉड २’ च्या शूटींगलाही सुरुवात केली आहे. त्याने स्वत: याबाबतची माहिती दिली आहे.

अक्षय कुमारने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचे पोस्ट शेअर केले आहे. या पोस्टरवरुन अक्षय कुमार या ‘ओह माय गॉड’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये भगवान श्री शंकराचे रुप साकारणार आहे. अक्षयने या चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. यातील एका पोस्टरमध्ये देवाने एका भक्ताचा हात पकडल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये अक्षय कुमार स्वत: श्री शंकराच्या रुपात पाहायला मिळत आहे. अक्षयने शेअर केलेल्या ‘ओह माय गॉड’ चित्रपटाच्या सिक्वेलचे पोस्टर प्रचंड व्हायरल होत आहे. “रख विश्वास, तू है शिव का दास”, असा संदेश या पोस्टरवर लिहिलेला आहे.

‘कर्ता करे न कर सके शिव करे सो होय ..’ असे कॅप्शन अक्षय या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना दिले आहे. “OMG2 साठी तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हवे आहेत. एका महत्त्वाच्या सामाजिक समस्येवर विचार मांडण्याचा आमचा प्रामाणिक आणि नम्र प्रयत्न आहे. आदियोगी आम्हाला हा प्रवास करण्यासाठी आशीर्वाद देवो. हर हर महादेव,” असे कॅप्शन अक्षयने दिले आहे.

दरम्यान अक्षय कुमार काही दिवसांपूर्वीच पंकज त्रिपाठींसोबत उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यानंतरच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. सध्या हे पोस्टर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहेत.

अक्षय कुमारचा नवा लूक

दरम्यान ‘ओह माय गॉड २’ हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ओह माय गॉड या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटाचे शूटींग उज्जैन, महाकालेश्वर मंदिर आणि इंदोरसह विविध ठिकाणी केले जाणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबतच अभिनेत्री यामी गौतमही दिसणार आहे. या चित्रपटातही अक्षय कुमार ‘शंकरा’च्या रुपात दिसणार आहे. त्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar to play lord shiva in oh my god 2 movie poster releases nrp

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या