‘बेल बॉटम’ चित्रपटाचे ‘मरजावां’ गाणं प्रदर्शित; अक्षय कुमार आणि वाणी कपूरची केमिस्ट्रि चर्चेत

अभिनेता अक्षय कुमार आणि वाणी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘बेल बॉटम’ चित्रपटाच पहिल गाणं प्रदर्शित.

akshay-kumar
Photo-Loksatta

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री वाणी कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘बेल बॉटम’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात वाणी कपूर अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल. काही दिवसांपूर्वी या बहुचर्चित  चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. ट्रेलर बघितल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या चित्रपटातील ‘मरजावां ‘ हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आले आहे.

मरजावां हे एक रोमॅंटिक गाणं आहे. या गाण्याची सुरवातीला अक्षय कुमार गिटार वाजवताना दिसतो. वाणी कपूर त्याच्याकडे बघून हसते आणि नंतर गाणं पुढे सुरू होतं. या गाण्यात ते परदेशातील सुंदर ठिकाणी डान्स करताना  व्हिडीओत दिसत आहेत. ते एकमेकांना प्रपोज करत रोमान्स करताना दिसत आहेत. हे गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याचे दिसून आले. एका युजरने यूट्यूबवर कमेंट करत त्यांच्या जोडीचे कौतुक देखील केले. तसंच ते दोघं एकत्र खूप छान दिसत आहे असल्याचे ही एका युजरने लिहिले.

खिलाडी कुमार अक्षयने या गाण्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत “बेल बॉटम या चित्रपटामधील माझं आवडीचे गाणं मरजावा प्रदर्शित झालं आहे. गुरणाजर आणि असीस कौर यांच्या आवाजातील हे गाणं माझ्या डोक्यातून जातच नाही आहे…” असे ट्वीट केले आहे. ‘बेल बॉटम’या सिनेमात भारतीय विमानाचं अपहरण झाल्यानंतर प्रवाशांच्या सुखरुप सुटकेसाठी सरकारकडून एका खास व्यक्तीकडे सोपवण्यात आलेलं ऑपरेशन आणि ही खास व्यक्ती म्हणजेच अक्षय कुमार. पुन्हा एकदा अक्षय कुमारची अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार म्हणजेच ‘बेल बॉटम’ आपल्या टीमच्या मदतीने कशा प्रकारे हे ऑपरेशन हाताळतो आणि प्रवाशांची सुटका करतो याचा थरार सिनेमात पाहायला मिळेल.

या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वाणी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या वर्षात एकापेक्षा एक हिट चित्रपट देण्यास तयार आहे. येत्या काळात ‘सूर्यवंशी’, ‘पृथ्वीराज’, ‘बच्चन पांडे’, ‘अंतरंगी रे’ ‘धूम 4’ हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Akshay kumar upcoming film bell bottom first song marjawaan out fans are praising them for their chemistry aad

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या