scorecardresearch

लाडक्या लेकीबद्दल ट्विंकल खन्नाला वाटतेय खंत; म्हणाली “करोना महामारीदरम्यान तिला…”

करोना महामारीच फटका जगभरातील अनेकांना बसला आहे

twinkle khanna
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना बॉलिवूडमधील एक आदर्श जोडपं. दोघे सोशल मीडियावर सक्रीय असतात. अक्षय कुमार बॉलिवूड चित्रपटांमध्ये व्यस्त असतो तर ट्विंकलचा स्वतःचा इंटेरियर डिझायनिंगचा व्यवसाय आहे. तसेच ती विविध कार्यक्रमात सहभागी होत असते. आपली मतं ठामपणे मांडत असते. नुकतेच तिने आपल्या मुलीविषयी भाष्य केलं आहे.

२०२० साली आलेल्या करोना महामारीच्या आजरामुळे संपूर्ण जगाचे चित्र बदलेले. संपूर्ण मानवी जीवन विस्कळीत झाले होते. ट्विंकल खन्ना नुकतीच शेफ संजय कपूर यांच्या कार्यक्रमात उपस्थित होती. तेव्हा तिने करोना काळात मुलीला कोणते जेवण दिले याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. ती असं म्हणाली, “महामारीच्या काळात मी तिला पीनट बटर सँडविच खायला दिले कारण मला स्वयंपाक करता येत नव्हता. मला स्वयंपाक कसा करायचा हे माहित नाही. माझ्या पटीने सांगितले होते मी जेवण बनवणार नाही.”

“माझी निवड जवळपास झाली होती पण…” आर्चीच्या भूमिकेबद्दल ‘घर, बंदूक, बिरयानी’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

ती पुढे म्हणाली “माझी मुलगी पुढे थेरपी घ्यायला गेली तर ती सांगेल की इतर पालक त्यांच्या मुलांना पास्ता, बनाना ब्रेड असे पदार्थ बनवून देते होते मात्र माझ्या आईने मला फक्त पीनट बटर सँडविच खायला दिले आहे.” असे तिने सांगितले.

ट्विंकल ही नेहमीच तिच्या वागण्यामुळे सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. काही दिवसांपूर्वी तिने लेकीबरोबर रिक्षातून प्रवास केला. या वेळेचा तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. ट्विंकल व अक्षयला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नितारा, आरव अशी त्यांची नाव आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 19:01 IST