scorecardresearch

‘खान’दानला मागे टाकत जगभरात सर्वाधिक कमाई करणारा ‘हा’ एकमेव भारतीय अभिनेता

वर्षभरात या अभिनेत्याने सुमारे ४६६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘फोर्ब्ज’ या मासिकाने सर्वाधिक मानधन घेणाऱ्या जगभरातील दहा कलाकारांची यादी जाहीर केली. या यादीत बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने चौथं स्थान पटकावलं आहे. वर्षभरात अक्षयने सुमारे ४६६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या यादीत पहिल्या स्थानावर ‘द रॉक’ म्हणजेच हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉनसन आहे. त्याची वर्षभराची कमाई सुमारे ६४० कोटी रुपये इतकी आहे. या यादीत स्थान मिळवणारा अक्षय एकमेव भारतीय अभिनेता आहे.

‘फोर्ब्ज’च्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ आहे. जून २०१८ ते जून २०१९ या कालावधीत त्याने सुमारे ५४७ कोटी रुपये कमावले आहेत. तर जॅकी चॅन यामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

आणखी वाचा : KBCच्या पहिल्या करोडपतीचं १९ वर्षांत असं बदललं आयुष्य; रातोरात बनला होता स्टार

अक्षय मोजकेच चित्रपट करतो परंतु ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात. सध्या अक्षयचा ‘मिशन मंगल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करतोय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने त्याला करिअरमध्ये करावा लागलेला संघर्ष आणि मिळालेले यश याबद्दल सांगितले. ”माझ्या आयुष्यात खूप चढ-उतार आले. जे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात येतात. जेव्हा माझ्या आयुष्यात वाईट काळ येतो तेव्हा मी माझ्याकडे असलेल्या गाड्या मोजतो, माझ्या घराकडे पाहतो. कधी कधी तर मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन तेथील वस्तू पाहत बसतो. माझ्याकडे एवढं सगळं असताना मी का वाईट वाटून घ्यायचं, फायदा काय आहे या सर्व संपत्तीचा? जगात असे ही लोक आहेत ज्यांच्याकडे काहीच नाही. करिअरच्या सुरुवातीला माझ्याकडे २०० रुपयेही नव्हते. आज माझ्याकडे सगळं काही आहे. त्यामुळे मी समाधानी आहे’ असं तो म्हणाला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akshay kumar world 4th highest paid actor on forbes list ssv

ताज्या बातम्या