बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या ‘भूत बंगला’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट अक्षयसाठी खूप खास आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’सह त्याचे अनेक चित्रपट सतत अपयशी ठरत असताना या अभिनेत्याला ‘भूत बंगला’ मिळाला. त्याने एक बीटीएस क्लिप शेअर केली आहे आणि त्याच्या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूत बंगला’बद्दल माहिती दिली आहे. यामध्ये अभिनेत्याची रोमँटिक स्टाइलही दिसून येत आहे. तसेच तो एका सुंदर अभिनेत्रीबरोबर नाचताना दिसत आहे.

अक्षय कुमारने एक क्लिप शेअर केली

अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये तो एका गाण्याचे शूटिंग करताना दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता धबधब्याखाली गोल टोपी घातलेला दिसत आहे. त्याच वेळी त्याने हिरव्या रंगाच्या शर्टसह हलक्या तपकिरी रंगाची पँटदेखील घातली आहे. याशिवाय अभिनेत्री वामिका गब्बीदेखील त्याच्याबरोबर दिसत आहे, जिने आकाशी निळ्या रंगाची साडी परिधान केलेली दिसते. हा व्हिडीओ अक्षय कुमारच्या आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूत बंगला’मधील आहे, जो पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारने चित्रपटाचे चित्रीकरण केले पूर्ण

अक्षय कुमारने चित्रपटाचा बीटीएस व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन दिले आहे. त्याने लिहिले, ‘भूत बंगला चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. प्रियदर्शन सरांबरोबरचा हा माझा सातवा चित्रपट, कधीही न संपणारा एकता कपूरबरोबरचा माझा दुसरा प्रवास. तसेच वामिका गब्बीबरोबरचा माझा पहिला, पण आशा आहे की शेवटचा नाही, जादुई प्रवास. वेडेपणा आणि अद्भुत आठवणींसाठी आभारी आहे’.

अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘भूत बंगला’चे दिग्दर्शन प्रियदर्शन करत आहे. त्याच वेळी, बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली शोभा कपूर आणि एकता आर कपूर या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त वामिका गब्बी, असरानी, जिशु सेनगुप्ता, परेश रावल, राजपाल यादव आणि तब्बू असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी २ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.