जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात किंवा कितीही धमाल केली तरीही कुटुंबासोबत व्यतीत केलेल्या काही क्षणांची सर या साऱ्याला येत नाही हेच खरं. कुटुंब अनेकांसाठी सर्वस्व असतं. कलाकारही त्यांच्या व्यग्र वेळापत्रकात कितीही गुंतलेले असले तरीही त्यातून वेळ काढून आपल्या कुटुंबाला तितकाच वेळ देतात. अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकलसुद्धा ‘परफेक्ट फॅमिली वुमन’ म्हणून स्वत:ला सिद्ध करत आहे. रुपेरी पडद्यावर ट्विंकल सध्या सक्रिय नसली तरीही निर्मिती क्षेत्र, स्तंभलेखन अशा विविध क्षेत्रांमध्ये ही ‘मिस फनी बोन्स’ बरीच चर्चेत आहे. यातूनच वेळ काढत तिने नुकताच आपल्या मुलांसोबत ‘लंच डेट’चा आनंद घेतला.
आरव आणि नितारासोबत ट्विंकलने व्यतीत केलेले हे सुरेख क्षण पाहता तुम्हालाही त्याचा हेवा वाटेल. नुकताच खिलाडी कुमारच्या मुलाचा म्हणजेच आरवचा १५ वा वाढदिवस झाला. त्यावेळी ट्विंकल आणि अक्षयने त्याला अनोख्या अंदाजात या खास दिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. पण, त्यापलीकडे जात ट्विंकलने त्याला ‘लंच डेट’वर नेलं. यावेळी त्यांच्यासोबत चिमुरडी निताराही होती.
वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर
https://www.instagram.com/p/BZHFEKIBm0K/
आरव, नितारा आणि ट्विंकल हॉटेलजवळ असतानाचे काही फोटो सोशल मीडियावर विविध अकाऊंट्सवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. आरव आणि नितारा आजही छायाचित्रकारांच्या गर्दीला नीट हाताळू शकत नसल्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. पण, येत्या काळात खिलाडी कुमारची ही मुलंसुद्धा इतर सेलिब्रिटी किड्सप्रमाणे ‘मीडिया फ्रेंडली’होतील असं म्हणायला हरकत नाही.