अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी हे मराठी मालिकांमधील बहुचर्चित जोडप्यांपैकी एक आहे. अक्षया-हार्दिकने साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला. मे महिन्यात या दोघांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. काही कलाकार मंडळींनी अक्षया-हार्दिकच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. काही महिन्यांपूर्वी अक्षया-हार्दिक लंडनला गेले होते. आता कोकणामध्ये अक्षया-हार्दिक सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

आणखी वाचा – परळमध्ये जन्म, तेथील राहणीमान अन्…; पूजा सावंतला आठवले चाळीमधील ‘ते’ जुने दिवस

Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल
what is the right way to wash and store grapes
द्राक्षांवरील जंतू कसे घालवायचे? ‘व्हिनेगर अन् सोडा’ खरंच ठरतो उपयोगी? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
two boys suv car driving on goa protected turtle beach morjim video goes viral case police case registered
गोव्याच्या बीचवरील तरुणांच्या ‘त्या’ कृतीवर भडकले लोक; Video पाहून म्हणाले, “बंद करा…”
Viral video of a rat in trains AC coach Woman shares video on social media Railways responds
Video : बापरे! रेल्वेच्या एसी डब्यात फिरत होता चक्क उंदीर, महिलेने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडप्यांमध्ये अक्षय-हार्दिकचं नाव टॉपला आहे. या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री तर सगळ्यांनीच पाहिली. पण ऑफस्क्रिन देखील या अक्षया-हार्दिकचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. दापोली समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना अक्षया-हार्दिकचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये दोघांचाही रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. सुमद्रकिनारी एकमेकांच्या प्रेमामध्ये अक्षया-हार्दिक आकंठ बुडालेले दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ अगदी काही तासांमध्येच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच आमचं आवडतं सेलिब्रिटी कपल, फारच सुंदर अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच या सेलिब्रिटी कपलला नेटकऱ्यांची अधिकाधिक पसंती मिळत आहेत.

आणखी वाचा – हिंदी चित्रपट सुपरफ्लॉप अन् मराठी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर बाजी, ‘दगडी चाळ २’ने तीन दिवसांमध्येच कमावले इतके कोटी

दरम्यान अक्षया-हार्दिकने त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केली आहे. मध्यंतरी त्यांच्या केळवणाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पुण्यामध्येच या दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच या विवाहसोहळ्याला कोण कोण हजेरी लावणार? अक्षया-हार्दिकचा लूक कसा असणार? हे काही दिवसांत समजेलच. पण त्यापूर्वी अक्षया-हार्दिक एकमेकांना पुरेसा वेळ देत आहेत.