“विचार केला आधी थोडे पैसै कमवावे…”; रिचासोबत लग्न करण्याच्या प्रश्नावर अली फजलचं उत्तर

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच अली आणि रिचा लग्न बंधनात अडकणार होते. मात्र करोना महामारीमुळे त्यांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

ali-fazal-and-richa-chadha
(File Photo)

बॉलिवूड अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच अली आणि रिचा लग्न बंधनात अडकणार होते. मात्र करोना महामारीच्या संकटामुळे त्यांनी लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा अली आणि रिचा लवकरच लग्न बंधनात अडकणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. चाहते देखील अली आणि रिचाच्या लग्न सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मात्र अली फैजलने लग्न करण्याआधी त्याला खूप पैसै कमवायचे आहेत या गोष्टीचा खुलासा केलाय. रेडिओ होस्ट सिद्धार्थकननला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अलीने लग्नाच्या प्लानबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. अली म्हणाला, “मागील वर्ष सर्वांसाठीच खूप वाईट होतं. सर्वांनाच याची कल्पना आहे. माझ्या कुटुंबात देखील दु:खद घटना घडल्या. त्यामुळे आम्ही विचार केला की आपण हे लग्न सगळ्यांसोबत सेलिब्रेट करू. मला माहित नाही केव्हा आणि कसं. पण विचार केला की आधी थोडा पैसा कमावू कारण काम पण थांबलं होतं. त्यामुळे सेलिब्रेट करण्यासाठी थोडी रोकडा पैसा हवा.” असं अली म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ali fazal (@alifazal9)

हे देखील वाचा: ९ वर्षांपूर्वी ‘असा’ दिसायचा विकी कौशल; शेअर केला पहिल्या ऑडिशनचा फोटो

या मुलाखतीत अलीने त्याच्या पहिल्या रिलेशनशिपबद्दलही मोकळेपणाने गप्पा मारल्या. तो म्हणाला, “मला माझ्या पहिल्या रिलेशनशिपबद्द सगळं विसरून जायचं आहे. ते नातं पूर्ण बिघडलं होतं. मला माहितेय आपण सर्व यातून जातो.” असं अली म्हणाला.

अली फजल आणि रिचा चड्ढाने ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्नस्’ या सिनेमातून एकत्र काम केलं आहे. सोशल मीडियावर देखील अली आणि रिचा त्याचे एकत्र एन्जॉय करतानाचे अनेक फोटो शेअर करत असतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ali fazal revels marriage plans with richa chadha siad will make money first for wedding celebration kpw

ताज्या बातम्या