VIDEO : सून गरोदर अन् नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावेना, आजी होणार म्हटल्यावर व्यक्त केला आनंद

आपल्या कुटुंबामध्ये नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे हे कळताच नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Alia Bhatt ranbir kapoor
आपल्या कुटुंबामध्ये नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे हे कळताच नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडप्याच्या यादीमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं नाव टॉपला आहे. आलिया-रणबीने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. एप्रिलमध्ये या दोघांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. आता कपूर कुटुंबियांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटलं ना…पण आलियानेच स्वतः इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो शेअर करत याची माहिती दिली. रणबीरची आई नीतू कपूर यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे.

आणखी वाचा – “आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा”; एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेनंतर किरण मानेंचा संताप

कपूर आणि भट्ट कुटुंबियांकडे सध्या आनंदाचं वातावरण आहे. घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार म्हटल्यावर सगळेच खूश आहेत. अशामध्येच नीतू यांना त्यांच्या चित्रीकरणाच्या सेटबाहेर पापाराझी छायाचित्रकारांनी घेरलं. यावेळी छायाचित्रकारांनी नीतू यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नीतू यांच्या चेहऱ्यावरील हास्य खरंच पाहण्यासारखं होतं. शिवाय त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

पाहा व्हिडीओ

तुम्ही आता आजी होणार आहे कसं वाटतंय? असा प्रश्न छायाचित्रकारांनी नीतू यांना विचारला. यावेळी त्या हसत म्हणाल्या, “धन्यवाद…पण संपूर्ण जगजाहिर झालं आहे की आता मी आजी होणार आहे.” आलियाने सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली असल्याचं यावेळी नीतू यांना छायाचित्रकारांनी सांगितलं. कपूर-भट्ट कुटुंबिय सध्या हा आनंद साजरा करत आहेत.

आणखी वाचा – VIDEO : अभिनेता-दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे सुपरहिट, अन् वयाच्या ७९व्या वर्षी शेतामध्ये कष्ट करताहेत वडील

रणबीर आणि आलिया लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट पहिला भाग आहे आणि याचे आणखी दोन भाग येणार आहेत. सध्यातरी आलियाने आपलं हातातलं काम पूर्ण करत चित्रपटांमधून ब्रेक घेतला असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alia bhatt announce her pregnancy ranbir kapoor mother neetu too much happy and her video viral on social media see reaction kmd

Next Story
“आज ठाण्यात शिवसेना आहे ती केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे…”, आरोह वेलणकरचे वक्तव्य चर्चेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी