scorecardresearch

RRR च्या यशानंतर राजामौली- आलिया भट्ट यांच्यात वाद? अभिनेत्रीच्या ‘या’ कृतीने वेधलं सर्वांचं लक्ष

आलिया भट्टनं एस एस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटात सीता ही भूमिका साकारली आहे.

alia bhatt, s s rajamauli, ramcharam rrr film, alia bhatt instagram, alia bhatt film, alia bhatt in rrr, आलिया भट्ट, आरआरआर, रामचरण, एस एस राजामौली, आलिया भट्ट इन्स्टाग्राम
या चित्रपटाला एवढं यश मिळत असताना आलिया भट्ट मात्र दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्यावर नाराज असलेली पाहायला मिळात आहे.

सध्या सोशल मीडियावर दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाची बरीच चर्चा होताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात ज्युनिअर एटीआर, रामचरण यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची देखील मुख्य भूमिका आहे. मात्र या चित्रपटाला एवढं यश मिळत असताना आलिया भट्ट मात्र दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्यावर नाराज असलेली पाहायला मिळात आहे. अभिनेत्रीच्या एका कृतीनं आता सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार आलिया भट्ट ‘RRR’ चे दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्यावर नाराज आहे ‘RRR’च्या फायनल कटमध्ये आलिया भट्टच्या वाट्याला फारच कमी स्क्रीन आली आहे. आपल्याला मिळालेल्या या खूपच लहानशा भूमिकेमुळे आलिया नाराज झाली असून तिने या चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट इन्स्टाग्रामवर वरून डिलिट केल्या आहेत. एवढंच नाही तर तिने एस एस राजामौली यांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याच्या देखील चर्चा होती. मात्र यात कोणतंही तथ्य नाही. आलियाच्या फॉलोइंग लिस्टमध्ये अद्याप राजामौली यांचं नाव आहे.

आणखी वाचा- Video: खिल्ली उडवणाऱ्या शाहरुख- सैफला निल नितिन मुकेशनं करुन दिली होती संस्कारांची आठवण

दरम्यान आलियाच्या या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलायचं तर या चित्रपटात तिची भूमिका खूपच लहान आहे आणि इतर कलाकारांच्या तुलनेत म्हणावी तशी दमदार भूमिकाही तिच्या वाट्याला आलेली नाही. आलियानं साकारलेल्या सीता या भूमिकेपेक्षा अजय देवगणची पाहुण्या कलाकाराची भूमिका जास्त दमदार वाटते. एवढंच नाही तर आलिया अलिकडेच झालेल्या प्रमोशनल इव्हेंटमध्येही दिसली नव्हती. मात्र यावर आलिया किंवा राजामौली यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2022 at 16:24 IST