आलिया भट्ट सध्या तिच्या सिनेमांसोबतच तिच्या प्रेग्नेंसीमुळे चांगलीच चर्चेत आहे. आई होणार असली तरी आलियाने तिच्या कामात खंड पडू दिलेला नाही. आलियाचा ‘डार्लिंग्ज’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. तर ‘ब्रह्मास्त्र’ हे दोन सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमांच्या प्रमोशनमध्ये आलिया व्यग्र आहे. प्रत्येक प्रमोशन इव्हेंटमध्ये आलियाला वेगवेगळ्या लूकमध्ये स्पॉट करण्यात आलंय. यावेळी आलिया तिचं बेबी बंप लपविण्यासाठी खास कपडे परिधान करत असल्याचं दिसून आलंय. नुकतच आलियाला स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी मात्र आलियाने बिनधास्तपणे बेबी बंप फ्लॉन्ट केल्याचं दिसून आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आलियाने नुकतीच ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत पती रणबीर कपूर तसचं दिग्दर्शक अयान मुखर्जीला स्पॉट करण्यात आलं होतं. खरं तर ‘डार्लिंग्ज’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान आलियाने कधी कुर्ता परिधान केला तर कधी शर्ट, पॅन्ट आणि शॉर्ट ड्रेसही. मात्र तिने परिधान केलेले सर्वच कपडे सैल असल्याने कधीच तिचं बेबी बंप दिसून आलं नाही. ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनसाठी मात्र आलियाने ब्राऊन रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये आलियाचं बेबी बंप दिसून येत आहे. रणबीर आणि आलियाने फोटोग्राफर्सना काही पोजही दिल्या. यावेळी रणबीर आलियाची काळजी घेत असल्याचं दिसून आलं.

हे देखील वाचा: “कधीकधी आत्महत्या करण्याचा विचार यायचा…”, ‘त्या’ कठीण काळाबद्दल दीपिका पदुकोणचे वक्तव्य

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आलिया आणि रणबीरचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यात आलिया रणबीरची जोडी खूपच क्युट दिसत आहे. आलिया बिनधास्तपणे बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसतेय. आलिया आणि रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडीओला पसंती देत आहेत.


आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या लूकमधील काही फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोत गरोदर असलेल्या आलियाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळतोय. “प्रेससोबत देवा देवा पाहण्यासाठी सर्व सज्ज आहोत आणि माझा चिमुकला डार्लिंगही” असं खास कॅप्शन तिने या फोटोला दिलंय.

५ ऑगस्टला आलियाचा ‘डार्लिग्ज’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. तर रणबीर कपूरसोबत तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच आगामी काळात ती रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ तसेच हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt flaunts baby bump brahmastra promotion kpw
First published on: 06-08-2022 at 18:05 IST