बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. आलिया लवकरच प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी आणि एसएस राजमौली यांच्या ‘RRR’ या चित्रपटात झळकणार आहे. ‘RRR’ या चित्रपटातून ती तेलुगू चित्रपटसृष्टीत डेब्यू करत आहे. मात्र आलियाचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट ६ आणि ७ जानेवारी २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होते. पण आता संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

संजय लीला भन्साळी यांनी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. नुकतंच आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर याबाबतची घोषणा केली आहे. याबाबतचा एक फोटो तिने पोस्ट केला आहे. “आम्हाला सांगण्यात फार आनंद होतोय की, संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. संजय लीला भन्साळी आणि डॉ. जयंतीलाल गडा (पेन स्टुडिओ द्वारे निर्मित चित्रपट १८ फेब्रुवारी २०२२ ला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे,” असे तिने यात म्हटले आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
The Kerala Story triggering political drama in Kerala In Loksabha Polls 2024
‘द केरला स्टोरी’चा राजकीय आखाड्यात प्रवेश; केरळमधील वातावरण तापले; वाचा नक्की काय आहे प्रकरण!
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्यानंतर एसएस राजमौली यांनी संजय लीला भन्साळी आणि जयंतीलाल गडा यांचे आभार मानले आहेत. “जयंतीलाल गडा आणि संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत घेतलेला निर्णय प्रशंसनीय आहे. गंगूबाई काठियावाडीचे हार्दिक अभिनंदन,” असे त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे. राजामौली यांच्या या ट्विटवरून ते फार खूश असल्याचे दिसत आहेत.

दरम्यान आलियाचा ‘RRR’ हा चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज होत आहे. त्यामुळे आलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ एकाच वेळी प्रदर्शित झाला असता तर त्याचा थेट परिणाम उत्तर भारतातील दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर होऊ शकतो. त्यामुळे संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.