स्टेजवर नाचताना फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आलियाचा हात भाजला

सध्या आलिया या दुखापतीमधून सावरत असल्याचे समजत आहे.

Alia Bhatt injured, suffers minor burns, Bollywood, Mishap on stages, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
यावेळी स्टेजवर आजुबाजूला फटाक्यांची आतीषबाजी सुरू असताना या फटाक्यांमधून बाहेर पडलेल्या आगीचा लोळ थेट आलियाच्या अंगावर आला

एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान स्टेजवर नाचताना सुरू असलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिचा हात आणि चेहऱ्याचा काही भाग भाजल्याची दुर्दैवी घटना घडली. आलिया रविवारी बीग स्टार एंटरटेनमेंट पुरस्कार सोहळ्यात स्टेजवर नृत्य सादर करत असताना रात्री १०.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी स्टेजवर आजुबाजूला फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना या फटाक्यांमधून बाहेर पडलेल्या आगीचा लोळ थेट आलियाच्या अंगावर आला. यामध्ये तिच्या हाताचा आणि चेहऱ्याचा काही भाग भाजल्याचे समजते. दरम्यान, या प्रकारानंतर आलियावर लगेचच प्राथमिक उपचार करण्यात आले आणि तिला घरी पाठवण्यात आले. सध्या आलिया या दुखापतीमधून सावरत असल्याचे समजत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Alia bhatt injured suffers minor burns on hands

ताज्या बातम्या