आलिया भट्टचा नवा ‘कटोरी कट’ पाहिलात का?

हेअरस्टाइलमुळे पुन्हा सोशल मीडियावर झाली ट्रोल

आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सिनेसृष्टीत आपल्या सर्वोत्तम ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. पण नुकताच तिचा एक नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या लूकमध्ये आलियाला पाहून स्टाइल आयकॉन आलिया भट्ट हीच का असा प्रश्न अनेकांना पडेल. आलियाने तिची हेअर स्टाइल बदलली आहे. तिने लांब केसांना कात्री लावून केस फारच लहान केले आहेत. तिच्या या लहान केसांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/BcgiVkaDo9m/

‘अॅली’ मासिकासाठी तिने एक खास फोटोशूट केले होते. काहींना तिचा लूक आवडला तर काहींनी सडकून टीका केली. या फोटोंमध्ये आलिया स्मार्ट दिसत असली तरी सोशल मीडियावर तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे. तिच्या केसांवर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर तिच्या हेअर स्टाइलला ‘कटोरा कट’ असे म्हणण्यात आले आहे.

या मासिकाने नुकताच त्यांचा २१ वा वर्धापन दिन साजरा केला. यावेळी त्यांनी कव्हर फोटोवर आलियाची निवड केली. या फोटोशूटसाठीच तिने वेगळा लूक केला होता. ती पहिल्यांदाच बॉय कटमध्ये दिसली. या फोटोशूटमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर ड्रेस घातला आहे.

https://www.instagram.com/p/Bcbse8gDlDd/

आलियाच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच मेघना गुलझार दिग्दर्शित ‘राजी’ या सिनेमात दिसणार आहे. सध्या काश्मिरमध्ये सिनेमाचे चित्रीकरण सुरू आहे. सिनेमात आलिया एका काश्मिरी मुलीची भूमिका साकारत असून तिचा नवरा पाकिस्तानचा लष्करी अधिकारी असतो. घर की देश या पेचात पडलेल्या मुलीची व्यथा या सिनेमात मांडण्यात आली आहे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Alia bhatt newest hairstyle for magazine photoshoot see pictures of alia bhatt