“मॅडम रणबीरसोबत चाला…”; आलियाचे भन्नाट उत्तर, व्हिडीओ व्हायरल

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत आहे.

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र यंदाची दिवाळी रणबीर आणि आलिया एकत्र साजरी करताना पाहायला मिळाले. यावेळी पापराझींनीही आलिया आणि रणबीरला कॅमेऱ्यात एकत्र कैद करण्याची एकही संधी सोडली नाही. पण यावेळी एक अनोखा किस्सा पाहायला मिळाला.

दरम्यान दिवाळीच्या निमित्ताने आलिया आणि रणबीरने एकत्र एका पुजेला हजेरी लावली. या पुजेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी देखील उपस्थित होता. यावेळी रणबीरआणि आलिया बाहेर येत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात काही फोटोग्राफर रणबीर आणि आलियाचे फोटो काढताना पाहायला मिळत आहे. दरम्यान यावेळी आलिया ही रणबीरच्या थोडीशी पुढे चालत असल्याने अनेक पापराझींना त्यांचा फोटो काढताना अडचणी येत होत्या.

आलियाच्या रणबीरला दिवाळीनिमित्त खास शुभेच्छा, फोटो शेअर करत म्हणाली…

त्यामुळे एकाने तिला आलिया मॅडम रणबीरसोबत चाला, असा सल्ला दिला. त्यावर पटकन आलिया म्हणाली, “मी आरके सोबतच चालत आहे,” असे सांगत ती जोरजोरात हसू लागली. सध्या या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत आहे. ते दोघेही त्यांच्या अफेअरमुळे किंवा चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र दिवाळीच्या निमित्ताने नुकतंच आलियाने रणबीरसोबतचा एक छान रोमँटिक फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना तिने आणि प्रेमासोबत…दिवाळीच्या शुभेच्छा, असे आलियाने म्हटले होते.

आलियाने दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या त्या फोटोत रणबीर आणि आलिया हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही निळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. त्यांच्या या फोटोत एकमेकांकडे बघताना फार गोड हसून लाजून बघत आहेत.

मे २०१८ मध्ये अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात आलिया- रणबीर जोडपं पहिल्यांदा समोर आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा आहे. एका मुलाखतीत रणबीरनं आलियावरचं आपलं प्रेमही मान्य केलं होतं. त्यानंतर आता आलियानेही खुल्लम खुल्ला प्रेमाची कबुली दिली आहे. दरम्यान ही लोकप्रिय जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटातून दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Alia bhatt reaction on paparazzi request related to ranbir kapoor diwali video goes viral nrp