scorecardresearch

‘आता मी अभिमानाने सांगू शकते IIT मध्ये होते!’ आलिया भट्टची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आलिया भट्टने शेअर केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेत आहे.

‘आता मी अभिमानाने सांगू शकते IIT मध्ये होते!’ आलिया भट्टची ‘ती’ पोस्ट चर्चेत
अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' चे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. अयान मुखर्जी लिखित आणि दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र : पार्ट वन शिवा’ हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जून, मौनी रॉय हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. भारतीय पौराणिक कथांवर आधारित या चित्रपटाचे तीन भाग असणार आहेत. चित्रपटातील सर्वच कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चित्रपटाच्या प्रमोशन करत आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी रणबीर कपूर, नागार्जून आणि एस.एस. राजामौली चैन्नईला पोहचले होते.

आलिया-रणबीर आणि ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या टीमने शनिवारी प्रमोशनकरिता आय.आय.टी. मुंबईला भेट दिली. तासभर चाललेल्या या कार्यक्रमामध्ये आलिया याच चित्रपटातील ‘केसरियाँ’ हे लोकप्रिय गाणं गायली. शेजारी बसलेल्या रणबीरने टाळ्या वाजवत तिचे कौतुक केले. या प्रमोशनल कार्यक्रमामध्ये आलियाने फिकट तपकिरी रंगाचा शर्ट आणि बेलबॉटम पद्धतीची डेनिम जीन्स घातली होती.

आणखी वाचा- Video : “तू कुठले ५० चित्रपट केलेस…” जेव्हा भर मुलाखतीत शाहिद कपूरने केला होता अनुष्काचा अपमान

आलियाने आय.आय.टी. भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आलियाने या फोटोंना ‘आय.आय.टी. मुंबई.. आम्ही आलो!!! प्रमोशनच्या निमित्ताने का होईना मी आय.आय.टी. मध्ये होते (एका तासासाठी) हे अभिमानाने सांगू शकेन. ९ सप्टेंबर – ‘ब्रह्मास्त्र’ ‘ असे कॅप्शन दिले आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या चित्रीकरणाच्या वेळी रणबीर आणि आलिया एकमेकांच्या प्रेमात पडले. एप्रिल महिन्यामध्ये त्यांनी लग्न केले. काही महिन्यापूर्वी आलियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचे जाहीर केले. प्रेग्नन्ट असूनही ती चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात हजर राहत आहे.

आणखी वाचा- आलिया भट्ट बनली गायिका, गायले ‘हे’ लोकप्रिय गाणे

‘ब्रह्मास्त्र’ दिग्दर्शक अयान मुखर्जीसाठी खूप खास आहे. त्याच्या या ड्रिम प्रोजेक्टमध्ये आणखी एका मोठा अभिनेता सामील झाला आहे. ‘एनटीआर फॉर ब्रह्मास्त्र’ या शब्दात त्याने तेलुगू सुपरस्टार ज्यू. एनटीआरचे स्वागत केले आहे. ‘या प्रवासात मला अशा दिग्गजांसह काम करायची संधी मिळाली, ज्यांच्याबद्दल बोलताना माझे शब्द नेहमी अपुरे पडतात.’ब्रह्मास्त्र’च्या आकाशातला नवा तारा – ज्यू. एनटीआर. असा तारा जो सदैव चमकत असतो.’ असे म्हणत अयानने एनटीआर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे जाहीर केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Alia bhatt share post on instagram goes viral say i can proudly say i got into iit mrj