बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र अद्याप त्या दोघांनीही प्रेमाची कोणतीही कबूली दिली नव्हती. पण नुकतंच आलियाने रणबीरसोबतचा एका छान फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेमाची कबूली दिली आहे. त्यामुळे सध्या आलियाची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत आहे. ते दोघेही त्यांच्या अफेअरमुळे किंवा चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पण आता हे दोघे चर्चेत येण्याचं कारण वेगळंच आहे. आज रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आलियाने त्याला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाने रणबीरसोबत समुद्रकिनारी बसलेला एक फोटो शेअर केला आहे. यात आलिया रणबीरच्या खांद्यावर डोकं ठेवून बसल्याचे दिसत आहे. यावेळी ते दोघेही सूर्यास्ताची मज्जा अनुभवताना पाहायला मिळत आहे. आलियाने पोस्ट केलेल्या या फोटोत रणबीरचा चेहरा दिसत नसला तरीही तिची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. रणबीर-आलियाचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

आलियाने हा फोटो पोस्ट करतेवेळी happy birthday my life, अशी कॅप्शन दिली आहे. आलियाच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रणबीर कपूरची बहिण रिद्धीमा कपूर हिनेही आलियाच्या या पोस्टवर कमेंट केली आहे. रिद्धीमाने त्या दोघांच्या फोटोखाली हार्ट इमोजी शेअर केला आहे.

मे २०१८ मध्ये अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात आलिया- रणबीर जोडपं पहिल्यांदा समोर आलं होतं. तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा आहे. एका मुलाखतीत रणबीरनं आलियावरचं आपलं प्रेमही मान्य केलं होतं. त्यानंतर आता आलियानेही खुल्लम खुल्ला प्रेमाची कबुली दिली आहे. दरम्यान ही लोकप्रिय जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर अयान मुखर्जीच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटातून दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते.